सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण -कंगना रनौतचीही होणार चौकशी

पुणे-मुंबई बॉलीवूड
Spread the love

मुंबई – अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या कथित आत्महत्येचा पोलिस कसून तपास करत आहेत. या प्रकरणात सुशांतचे नातेवाईक आणि मित्रांसह आतापर्यंत फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित 30 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. ताज्या वृत्तानुसार आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिचीही पोलिस चौकशी करणार आहेत. आज मुंबई पोलिसांनी कंगनाला चौकशीसाठी एक स्मरणपत्र पाठविले आहे. गेल्या महिन्यात पोलिसांनी कंगनासह बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींना चौकशीसाठी नोटिसा पाठवल्या होत्या.

सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येपासून कंगना रनौत सतत बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींना लक्ष्य करीत आहे. आपल्या विविध विधानांमध्ये तीने बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कंपूशाही याबाबत खुलेपणाने आरोप केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना म्हणाली की सुशांत सुसाइड प्रकरणात पोलिसांनी अद्याप बॉलिवूडच्या एका विभागाची चौकशी अद्याप केलेली नाही.

कंगना एका मुलाखतीत म्हणाली होती की, जर मी असे काही सांगितले ज्याचा पुरावा मी देऊ शकत नाही किंवा  जे मी सिद्ध करु शकत नाही परंतु, जे लोकांच्या हिताचे नाही, तर मी माझे पद्मश्री परत करीन. असे असेल तर  मी या सन्मानास पात्र नाही. मी असं कधीच म्हटले नव्हते की कुणाला सुशांतचा मृत्यू व्हावा अशी इच्छा होती पण बर्‍याच जणांना तो पूर्णपणे बर्बाद व्हावा असे वाटत होते. ज्या लोकांचे मन गिधाडाचे असते ते लोक इतरांचे मरण पाहू इच्छितात. निर्माता आदित्य चोपडा, चित्रपट निर्माते महेश भट्ट, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक करण जोहर आणि चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांनाही चौकशीसाठी बोलावले पाहिजे.

ती म्हणाली, ‘मुंबई पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावलं होतं. मनालीमध्ये असल्यामुळे कोणाला तरी माझा जबाब नोंद करण्यासाठी पाठवा अशी मी पोलिसांकडे मागणी केली. परंतु आतापर्यंत मला मुंबई पोलिसांकडून काहीच उत्तर मिळाले नाही.

कंगनाने सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूचे हत्या असे वर्णन केले होते. एका व्हिडिओमध्ये कंगना म्हणाली होती, ‘सुशांतसिंग राजपूत यांच्या हत्येनंतर बर्‍याच गोष्टी समोर आल्या आहेत. मी काही मुलाखती वाचल्या आहेत आणि काही लोकांशी बोललो आहे. त्याचे वडील म्हणतात की सुशांत चित्रपटसृष्टीतील तणावामुळे खूप चिंतीत होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *