शरद पवारांनी माझी उमेदवारी जाहीर केली होती : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट

Sharad Pawar had announced my candidature
Sharad Pawar had announced my candidature

पुणे(प्रतिनिधि)—“मी शरद पवारांकडे उमेदवारी मागायला गेलो होतो, त्यावेळी पवारसाहेबांनी मानसिकता केली होती आणि उमेदवारीही जाहीर केली होती. मात्र, पुन्हा काय झालं त्यांचं त्यांनाच माहिती.. असा गौप्यस्फोट  ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजिट वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून शांतता रॅलीला हिंगोलीतून  सुरुवात केली आहे. या रॅलीच्या माध्यमातून ते मराठा समाजाची संवाद साधून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके  यांनीही पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या भावना मांडताना आरक्षणावर भाष्य केले. तर, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांकडून आपलं तिकीट फायनल झालं होतं, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. माढा लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण हाके निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. अखेर, त्यांनी माढा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली.

अधिक वाचा  आदर्श लोकप्रतिनिधी दिवंगत बाळासाहेब साळुंके यांचे जीवन प्रेरक - विजय सांपला

राजकारणात आणि सभागृहात सामाजिक समतोल साधायचा असेल तर प्रतिनिधीत्व एखाद-दुसरं तरी पुढे यायला पाहिजे. पण, त्या प्रतिनिधींना देखील टार्गेट केलं जातं आहे, ही महाराष्ट्रातील जनसामान्यांची भावना आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले. यावेळी, तुम्हीही लोकसभा निवडणूक लढवली पण, जनतेनं तुम्हाला नाकारलं, तेव्हा तुम्ही उमेदवारी मागायला शरद पवारांकडे गेला होतात का? असा प्रश्न हाकेंना विचारला असता, त्यावरही त्यांनी उत्तर दिलं.

ते म्हणाले, होय, निश्चितच मी शरद पवारांकडे उमेदवारी मागायला गेलो होतो, त्यावेळी पवारसाहेबांनी मानसिकता केली होती आणि उमेदवारीही जाहीर केली होती. मात्र, पुन्हा काय झालं त्याचं त्यांनाच माहिती.. असा गौप्यस्फोट लक्ष्मण हाकेंनी केला. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातून हाके यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा शरद पवारांकडे मांडली होती. तसेच, मी ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्या मतदारसंघात मला ५ हजार मतं पडली. कारण, आपला ओबीसी समाजाचा प्रतिनिधी त्या सभागृहात गेला पाहिजे ही भावनाच अद्यापही तेथील समाजात नाही. धनगराने कुठं खासदार व्हायचं असतं का, त्याने कुठं तिकीट मागायचं असतं का, गावातल्या तेल्याने, रामोश्याने कुठं लोकसभेचं तिकीट मागायचं असतं का, असे प्रश्न विचारले जातात ही समाजातील वस्तुस्थिती आहे, असे स्पष्टीकरण लक्ष्मण हाकेंनी दिले.

अधिक वाचा  राजीव सातव यांचा उपचाराला चांगला प्रतिसाद : प्रकृतीत सुधारणा

मी शिक्षित आहे, लोकसभा निवडणुकांसाठी काय मेरीट लागतं हे मला चांगलं माहिती आहे. पण, मी निवडणूकच लढवू नये असं नाही. आज संसदेत धनगर समाजाचा एकही खासदार नाही, एवढी मोठी धनगरांची संख्या असूनही एक खासदार नाही. मग, गावगाड्यातील छोट्या-छोट्या समाजाचं प्रतिनिधित्व किंवा प्रतिबिंब देशाच्या आणि महाराष्ट्राच्या संसदेत कसं उमटणार, या माणसांना सामाजिक न्याय मिळणार कसा? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही निवडणुका लढवल्या आहेत. त्यांनाही पराभव पत्कारावा लागला आहे. महात्मा फुले यांनी दोनवेळा निवडणूक लढवली होती, तर एकदा त्यांना केवळ २ मते पडली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पराभव याच देशात झाला होता. मी तुलना करत नाही पण उदाहरण देत आहे, कारण माझ्याकडे प्रचाराला पैसे देखील नव्हते, असे लक्ष्मण हाकेंनी सांगितलं.

अधिक वाचा  शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तरच देश सामर्थ्यवान होईल - अनिल घनवट

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love