राजस्थानात ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होणार?सचिन पायलट आमदारांसह दिल्लीत दाखल


मध्य प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झाल्यानंतर त्याच धर्तीवर राजस्थानातही ते यशस्वी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेशची पुनारावृत्ती राजस्थानमध्ये होणार नाही, अशी चर्चा राजकीय खेत्रात सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि युवा उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात वाद झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यातच पायलट दिल्लीला पोहोचले असून पक्षाचे २४ आमदार हरियाणाच्या हॉटेलमध्ये थांबले असल्याचे आणि त्यांचे आमदारांचे फोन बंद होत असल्याचे वृत्त समोर येत असून त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाशी संपर्क बंद केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया आणि तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यात वाढती संघर्ष चालू होता. कॉंग्रेसचे आमदार दोन गटांमध्ये विभागले गेले आणि शेवटी सरकार पडले. शिवराजसिंह चौहान यांनी पुन्हा मुकुट चढविला. राजस्थानमध्येही मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातही संघर्ष सुरु असल्याचे बोलले जात आहे,

अधिक वाचा  बॉलीवूड उत्तरप्रदेशला हलविण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी दिला हा इशारा

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांना राजस्थानातील राजकीय परिस्थितीची संपूर्ण कल्पना देण्यात आलेली आहे. आम्ही राजस्थानातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असून येथे मध्य प्रदेशासारखी स्थिती येऊ देणार नाही, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने माहिती देताना सांगितले आहे. सोनिया गांधी यांनी देखील या परिस्थितीची गांभिर्याने दखल घेतली आहे.

 दुसरीकडे मुख्यमंत्री गहलोत यांनी भाजपवर आरोप केला आहे की मध्य प्रदेशात आमदारांची खरेदी-विक्री केल्यानंतर आता त्यांची कार राजस्थानमध्ये पोहोचली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना सरकार खाली आणण्यासाठी आमिष दाखवत आहे. भारतीय जनता पक्ष राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्याचे प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप गहलोत यांनी केला आहे. सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आमदारांचा घोडेबाजार सुरू आहे, असा थेट आरोपही गहलोत यांनी केला आहे. सरकार पाडण्यासाठी भाजप कट कारस्थान करत असून त्यासाठी आमदारांना २५-२५ कोटींची ऑफर देण्यात येत आहे, असा गंभीर आरोप गहलोत यांनी केलाय.

अधिक वाचा  अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का देणारा निकाल

दरम्यान, तत्पूर्वी, राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या कथित प्रयत्नांच्या प्रकरणात पोलिसांच्या विशेष संचालन गटाने चौकशी सुरू केली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. सरकारचे प्रमुख अधिकारी महेश जोशी यांनाही नोटीस जारी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमीत कमी १० ते १२ आमदार व इतरांनाही नोटिसा जारी करण्यात येणार आहेत. चौकशीत असे निष्पन्न झाले की, दोन ते तीन आमदार हे भाजपच्या वतीने इतर आमदारांना पैसे देऊन वळविण्यात सामील होते. त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, विशेष गटाने सरकार पाडण्याच्या प्रयत्नांबाबत दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोन जण गेहलोत यांचे सरकार पाडण्यासाठीच्या घोडेबाजारात सामील असल्याचे सांगण्यात येत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love