मोदींची लोकप्रियता वाढली- ट्विटरवर झाले सहा कोटी फॉलोअर्स


नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर वाढली आहे. ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे आता सहा कोटी फॉलोअर्स झाले आहेत. यापूर्वी सप्टेंबर 2019 पर्यंत मोदींच्या फॉलोअर्सची  संख्या सुमारे पाच कोटी होती. मोदींनी आपले ट्विटर अकाउंट 2009 मध्ये सुरु केले होते.

फॉलोअर्सच्या यादीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पीएम मोदी यांच्यानंतर भारतीय नेत्यांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. ट्विटरवर अमित शहाचे दोन कोटी 16 लाख फॉलोअर्स आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे एक कोटी  99 लाख फॉलोअर्स असून ते तिसर्‍या क्रमांकावर आहेत. या फॉलोअर्सच्या यादीमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह एक कोटी ७८ लाख फॉलोअर्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी एक कोटी 52 लाख फॉलोअर्ससह पाचव्या क्रमांकावर आहेत.

अधिक वाचा  कोविड19 विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच-संशोधनाअंती पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याचा निष्कर्ष

डोनाल्ड ट्रम्प आणि बराक ओबामा यांच्यापेक्षा मोदी मागे

आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदी ट्विटर फॉलोअर्सच्या बाबतीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापेक्षा खूप मागे आहेत.  सध्या माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे 12.9 कोटी ट्विटर फॉलोअर्स आहेत तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 8.37 कोटी ट्विटर फॉलोअर्स आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love