पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये पुन्हा १० दिवसांचा लॉकडाऊन

महाराष्ट्र
Spread the love

काय बंद राहणार?काय सुरु राहणार?


पुणे–पुणे आणि पिंपरी-शहरात दि. १३ जुलै ते २३ जुलै असा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही घोषणा पत्रकार परिषदेत केली. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा या काळात सुरु राहणार आहेत.

दहा दिवसांपैकी पहिले पाच दिवस अत्यंत कडक स्वरूपाचा लॉकडाऊन असेल. त्यात फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दि. १८ ते २३ दरम्यान अत्यावश्यक सेवा दुकाने सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उघडी असतील. त्यात, किरण आणि भाजीपल्याचा समावेश असेल. नवीन लॉकडाऊन ची नियमावली उद्या (शनिवारी) सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही पोलीस आयुक्तालय परिसरात लॉकडाऊन लागू असेल. २२ गावांमध्ये कोरोनाच्या केसेस अधिक आहेत. त्यात आणखी गावे समाविष्ट होतील. पुढील दोन दिवस जनतेला पूर्वतयारीसाठी देण्यात आले आहेत.

दहा दिवसात चाचण्यांचे प्रमाण वेगाने वाढणार असून नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू घेऊन ठेवाव्यात. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस खरेदीसाठी आहेत. यामध्ये खरेदी करावी असे आवाहन पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.

म्हैसेकर म्हणाले, गेल्या काही दिवसांत पुण्यात कोरोनची संख्या खूप झपाटयाने वाढते आहे. त्या मुळे कोरोना साखळीला ब्रेक लावण्यासाठी हा लॉकडाऊन असेल तसेच या कालावधीत आरोग्य विभागाला सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी वेळ मिळणार आहे.या दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांना ऑनलाईन पासेस पोलिस आयुक्त उपलब्ध करून देणार आहे.

पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशाराच उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला होता.

कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षण कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्रमुख आव्हान आहे. सर्वांनी सजग राहून कामे करावीत, असे निर्देशही पवार यांनी दिले होते.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता. “कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वी दिला होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *