तंत्रज्ञान विषयक राजीव गांधींची व्हीजन नव्या पिढीपर्यंत पोचवणे ही आपली जबाबदारी – नाना पटोले

पुणे-मुंबई
Spread the love

पुणेमहिती तंत्रज्ञानाचा वापर आज चुकीच्या कारणांसाठी वेगाने केला जात आहे. तालिबानी देशात घुसतील अशाप्रकारचा अपप्रचार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे आज नाही तर प्रत्येक वेळी चुकीच्यापद्दतीने चुकीची महिती  अशाच पद्धतीने तरूण पिढीपर्यंत पोचवली जात आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी आयटीमधील तंत्रज्ञांनी प्रयत्न करावेत. तंत्रज्ञान देशात आणण्याबाबत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची व्हीजन काय होती हे तरूण पिढीपर्यत पोचवण्याची जबाबदारी कार्यकर्ते आणि आयटीमध्ये काम करणा-या आपल्या सर्वांची आहे असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज येथे केले.

भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीवं गांधी यांच्या जयंतीदिनी दरवर्षी ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेसच्यावतीने देण्यात येणा-या राजीव गांधी ऍवॉर्ड फॉर एक्सलन्स इन आयटी पुरस्काराच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. कायनेटिक कम्युनिकेशन्स लिमिटेडचे संचालक डॉ. दीपक शिकारपूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. गणेश नटराजन यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ई-झेस्टचे अध्यक्ष देवेंद्र देशमुख, अ‍ॅस्पायर नॉलेजचे अध्यक्ष संजय गांधी आणि क्रेस्कोचे संस्थापक पंकज शहा यांना राजीव गांधी अ‍ॅवॉर्ड फॉर एक्सलन्स इन आयटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेस्कॉमचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, आमदार शरद रणपिसे, बाळासाहेब शिवरकर, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे, रोहित टिळक, एनएसयुआयचे अध्यक्ष आरीफ शेख, लता राजगुरू, कार्यक्रमाचे संयोजक प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड आणि एआयपीसी पुणे दक्षिणचे अध्यक्ष मिलिंद गवंडी व्यासपीठावर उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, देशाला स्वातंत्र्यनंतर पंडित नेहरूपासून ते डॉ मनमोहनसिंगांपर्यंत इतके पंतप्रधान झाले कधीही तालिबान इकडे येईल असे कोणी कधीच म्हटले नाही अन आलेही नाही. आज मात्रआपल्या चुका, झाकण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून चुकीची महिती तरूण वर्गापर्यंत पोचवण्याचे काम सुरू आहे. तंत्रज्ञानाचा हा दुरूपयोग थांबवणे गरजेचे आहे. आज नावं बदलताहेत. नेहरूंनी स्वातंत्र भारतात संशोधनाला महत्व दिले, प्रय़ोगशाळा उघडल्या. इस्त्रोसारखी संस्था सुरू केली. राजीव गांधी यांनी 21 व्या शतकाचे तंत्रज्ञान देशात आणले. या गोष्टीही बदलल्या जातील त्यापूर्वीच आपण या गोष्टी आपणच नव्या पिढीपर्यंत पोचवल्या पाहिजेत.

डॉ.दीपक शिकारपूर म्हणाले, नव्या पिढीला जर ऐटित रहायचे असेल तर त्यांनी आयटी महिती तंत्रज्ञानाशी मैत्री केलीच पाहिजे. पूर्वी गुरूकुलमध्ये जाऊन मुले शिकत होती, आज करोनाच्या काळता मुले घरकुलात राहून शिकली याचे कारण म्हणजे महितीतंत्रज्ञानाने घेतलेली झेप. महाराष्ट्रात मोबाईलची कनेक्टीव्हीटी न मिळणे,कॉलड्रॉप ही मोठी समस्या झाली आहे. कारण गेल्या सहा वर्षात एकाही कंपनीने मोबाइल टॉवर उभे केलेले नाहीत. राज्य सरकाराने राज्यासाठी टॉवर पॉलिसी तयार करावी म्हणजे या सर्व समस्या चुटकीसरशी सुटतील. त्यासाठी नाना पटोले यांनी त्यात लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली.

कार्यक्रमाचे संयोजक अभय छाजेड म्हणाले, काही वर्षांपूर्वी आयटी कंपन्यांच्यासाठी पुणे शहराची बंगळुरू, हैद्राबादसारख्या शहरांशी स्पर्धा होती. आजही पुण्यात अनेक नामवंत आयटी कंपन्या आहेत. देशातील संगणक युगाचे जनक राजीव गांधी यांच्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यांच्या स्मृती नव्या पिढीत रूजवण्यासाठीच गेली तीन वर्षे त्यांच्या जयंतीदिनी महितीतंत्रज्ञान क्षेत्रात चांगली कामगिरी करण्या-या कंपन्या व तंत्रज्ञांना राजीव गांधी एक्सलन्स ऍवॉर्ड इन आयटी पुरस्काराने सन्मानित करत आहोत. देशातील प्रत्येक सरकार देशाला पुढे नेण्यासाठी काम करत असते. राजीव गांधी यांनी पेटवलेली तंत्रज्ञाना क्रांतीची मशाल पुढे सर्वच सरकारांनी ती प्रज्वलीतच ठेवली. त्यामुळे राजीव गांधी यांनी 21 व्या शतकातील भारताचे जे स्वन्प बघितले होते ते पूर्ण करण्याची जबाबदारी तरूण तंत्रज्ञांची आहे.

जीवन गौरव पुरस्कारा स्वीकारल्यावर उत्तर देताना डॉ. गणेश नटराजन म्हणाले, पुण्यात आज आयटी कंपन्यांमध्ये काम करणा-यांची संख्या काही लाख आहे पण लवकरच ती दहा लाखांच्यापुढे जाईल इतकी क्षमता महिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्यात आहे. पुढील दशकात प्रत्येक गाव तंत्रज्ञानाने जोडले गेलेले असेल. इतक्या वेगाने वाढणा-या या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य लोकांना अधिकाधिक करून देऊन त्यांचे जीवन सुकर करण्याचा आपण सर्वांनीच प्रय़त्न करू या, असे आव्हान त्यांनी केले. यावेळी अन्य पुरस्कारार्थी डॉ. विरेंद्र देशमुख, संजय गांधी आणि पंकज शहा यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेसवतीने महाराष्ट्राच्या सेक्रेटरी झाला पेरीवाल यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शायना नौशाद यांनी केले. आभार मिलिंद गवंडी यांनी मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *