कंगना रनौतचा मुंबई पोलिसांवर निशाना;म्हणाली, सुशांतसिंगच्या खून प्रकरणाच्या तपासाची थट्टा बंद करा


महेश भट्ट, कंगना रनौत, करण जोहर यांचीही चौकशी होणार

मुंबई(ऑनलाईन टीम)— अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी बॉलीवूड मधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अभिनेत्री कंगना रनौतने तर उघड भूमिका घेत घराणेशाही विरोधात मोहीमच उघडली आहे. सुशांतसिंग याच्या मृत्यूला एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवले आहेत.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितले की, या प्रकरणात आत्तापर्यंत ३७ जणांचे जबाब घेण्यात आले आहेत. महेश भट्ट यांचाही जबाब सुद्धा येत्या एक-दोन दिवसात नोंदवला जाईल. त्याबरोबरच कंगना रनौत हिलाही जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले आहे. तसेच कारण जोहर यांच्या व्यवस्थापकाला फोन करून जर गरज पडली तर करणलाही हजर राहावे लागेल असे सांगितले असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला-  ‘मुलखावेगळी ती’: योगातून जागतिक कीर्ती मिळविणाऱ्या डॉ. पल्लवी कव्हाणे

यावरून कंगना भडकली आहे. रविवारी दुपारी कंगना रनौतच्या डिजिटल टीमचे दोन ट्विट केले आहेत.  त्यातील पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “तर करण जोहरच्या व्यवस्थापकाला  समन्स पाठविले गेले आहे, आदित्य ठाकरे यांचे जिवलग मित्र करण जोहर यांना नाही”. मुंबई पोलिसांनी सुशांतसिंग राजपूत याच्या खून प्रकरणाच्या तपासाची थट्टा बंद करावी. त्यानंतर आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये कंगनाने मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला आहे.

कंगनाच्या टीमने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘समन्स बजावतानाही मुंबई पोलिस उघडपणे इतका निर्लज्जपणा कसा दाखवू शकतात?  कंगनाला समन्स पाठवले होते, तिच्या व्यवस्थापकाला नाही परंतु मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या जिवलग मित्राच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी बोलावले जाते असे का? साहेबांना त्रास होऊ नये यासाठी?

महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी कंगना रनौतच्या टीमने करण जोहरशी संबंधित एका सोशल मीडियाच्या  युजरच्या ट्विटला उत्तर दिले होते की ‘पोलिस त्यांना कधीच बोलावणार नाहीत कारण ते आदित्य उद्धव ठाकरे यांचे सर्वात चांगले मित्र आहेत. हे त्यांचे सरकार आहे आणि कंगनाच्या मुलाखतीपूर्वी त्यांनी हे प्रकरण बंद केले होते. या गोष्टीचा हाच सर्वात मोठा पुरावा आहे की ते त्यांच्या मित्रांना वाचवत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love