If you want to show Mardumaki, go to Delhi and show it

अमोल कोल्हेंचे अजित दादांना आव्हान

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Amol Kolhe’s challenge to Ajit Dada | शेतकरी (Farmer ) व जनेतच्या (Public)  हितासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे सांगणाऱया अजितदादांनी(Ajit Dada ) आता शेतकऱयांचे प्रश्न सोडून दाखवावेत, असे आव्हान राष्ट्रवादीचे(ncp)  नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी(Dr. Amol Kolhe)  उपमुख्यमंत्री (dcm) अजित पवार(Ajit Pawar )  यांना बुधवारी येथे दिले. 

 जुन्नर (Junnar येथून डॉ. कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चाला (Akrosh Morcha) सुरुवात झाली. त्या वेळी ते बोलत होते. मोर्चात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले. कोल्हे म्हणाले, सरकार सोडवू न शकलेल्या समस्या मी शेतकरी आक्रोश मोर्चातून मांडत आहे. त्यामुळे अजितदादांची चिडचिड होतेय का, हे तुम्ही त्यांनाच विचारा. सत्ता संघर्षावेळी जनता आणि शेतकऱयांच्या हितासाठी मी सत्तेत गेल्याचे अजितदादांनी सांगितले होते. ते मंत्री झाल्यावर त्यांचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत झाले. पण आता मात्र त्यांना शेतकऱयांचा विसर पडला आहे. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, की शेतकऱयांना समस्येतून मुक्त करावे. त्यांचे प्रश्न सोडवावेत. अजितदादांना आव्हान देण्याइतका मी मोठा नाही. फक्त सत्तेत आहात, तर शेतकऱयांसाठी इतके करा, असे सांगावेसे वाटते. 

केंद्र व राज्यातील सरकारने शेतकऱयांच्या तोंडाला फक्त पाने पुसली आहेत. 2410 रुपयांचा दर देऊन कांदा खरेदी करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले जाते. प्रत्यक्षात शेतकऱयांच्या ताटात माती कालवण्याचे काम होत आहे. मुख्यमंत्री म्हणतात, आमचे सरकार शेतकऱयांचे आहे. मग शेतकऱयांच्या प्रश्नावर तुम्ही गप्प का, असा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला. या सरकारला शेतकऱयांच्या प्रश्नांबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *