चीन आणि पाकिस्तानचा भारताविरुद्ध जैविक युद्धाचा कट;तीन वर्षांसाठी गुप्त करारही केला?


ऑनलाईन टीम —चीन आणि पाकिस्तान यांचे भारताविरुध्द कट- कारस्थाने करण्याचे उद्योग सुरूच आहेत असे दिसते आहे. एका रिपोर्टनुसार आता या दोन्ही शेजारच्या देशांनी भारताविरुद्ध जैविक युद्धाचा कट रचला आहे आणि त्यासाठी तीन वर्षांसाठी गुप्त करारही केला आहे.

दोन्ही देशांमधील छुप्या करारानुसार अ‍ॅन्थ्रॅक्स सारख्या धोकादायक विषाणूंवरील संशोधन करणे आणि  जैविक शस्त्रास्त्रांची संख्या वाढविण्याविषयी चर्चा झाली आहे. क्लाजोन नावाच्या युनिटने अनेक गुप्तचर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देऊन हा दावा केला आहे. कोरोना विषाणूबद्दल चीनवर जगभर टीका होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आरोप केला आहे की कोरोना विषाणूची उत्पत्ती वुहानच्या प्रयोगशाळेपासून झाली आहे.

सुरक्षा तज्ज्ञ अँटनी क्लान यांनी आपल्या अहवालात दावा केला आहे की त्याच लॅबने ‘वाढत्या संसर्गजन्य रोग’ विषयावर संशोधन करण्यासाठी ‘पाकिस्तानी सैन्य संरक्षण विज्ञान व तंत्रज्ञान संस्था’ (डीईएसटीओ) बरोबर करार केला आहे. या व्यतिरिक्त, साथीच्या रोगांच्या जैविक नियंत्रणाबद्दल देखील संशोधन केले जात आहे. भारताव्यतिरिक्त अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशांना देखील लक्ष्य केले जाईल, असेही मानले जात आहे. या देशांना संसर्गजन्य रोगांच्या फैलाव करण्यासाठी लक्ष्य केले जाईल. यासाठी जो खर्च येणार आहे तो चीनची वुहान लॅबच करणार आहे.

अधिक वाचा  अमेरिकेच्या निवडणुक इतिहासात असे दोनदा घडले आहे

अँथ्रॅक्स सारख्या धोकादायक विषाणूचा धोका

एका वृद्ध गुप्तचर स्रोताच्या हवाल्याने या अहवालात म्हटले आहे की पाक एजन्सी वुहान लॅबच्या सहकार्याने अँथ्रॅक्स सारख्या विषाणूंविषयी संशोधन करण्यात गुंतला आहे. हे इंटेलिजन्स कराराच्या अंतर्गत केले जात आहे. या कराराअंतर्गत जैविक शस्त्रे बनविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक माती परीक्षणही करण्यात आले आहे. चीनने पाकिस्तानी वैज्ञानिकांशी डेटा आणि माहिती सामायिक केली आहे.

पाकिस्तानी शास्त्रज्ञांना दिले जात आहे प्रशिक्षण

पाकिस्तानी शास्त्रज्ञांना वूहानच्या प्रयोगशाळेत याबाबतचे कठोर प्रशिक्षण दिले जात आहे जेणेकरुन ते जैविक शस्त्रे विकसित करु शकतील. त्यामुळे पाकिस्तानला स्वतःचा विषाणू तयार करता येणार आहे. गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानकडे अशाप्रकारे स्वतःचे विषाणू असतील जे अत्यंत धोकादायक आहे. या गुप्तचर प्रकल्पावर कोणत्याही सरकारी विद्यापीठ किंवा सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही.

अधिक वाचा  श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा:सर्व कॅबिनेट मंत्र्यांनीही दिले राजीनामे

चीन पाकिस्तानात आपली लॅब तयार करण्याची तयारी करत आहे

कोरोना विषाणूवर जगात टीकेला सामोरे गेल्यानंतर आता चीनला त्यांच्या देशातून काहीही करायचे नाहीये. त्यामुळे आता पाकिस्तानच्या खांद्यावर बंदुक ठेवून चीन निशाना साधण्याच्या प्रयत्नात आहे. यामध्ये सर्वात चिंतेची बाब ही आहे की, पाकिस्तानच्या लॅबमध्ये अशी कुठलीही व्यवस्था नाही की या लॅबमधून विषाणू बाहेर पडण्यापासून त्यांना रोखता येईल. या अहवालानुसार,  चीनने  आपल्यावरील होणाऱ्या टीकेपासून बचाव करण्यासाठी जैविक शस्त्रे प्रयोगशाळा आपल्या देशातून पाकिस्तानमध्ये हलविण्याची योजना  आखली आहे.

इबोलासारखा विषाणू देखील बनविला

या गुप्तचर अहवालानुसार चीन आणि पाकिस्तान यांनी मिळून एक धोकादायक विषाणूही तयार केला आहे. या कराराअंतर्गत क्रीमेन कोंगो हेमोरेजिक फीवर वायरसचा (सीसीएचएफव्ही) प्रयोग देखील सुरु करण्यात आला आहे.  या विषाणूचा संसर्ग झालेल्या 25 टक्के लोकांचा मृत्यू निश्चित मानला जात आहे. हा विषाणू इबोला व्हायरस प्रमाणेच असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानमधील ज्या प्रयोगशाळेत या विषाणूची चाचणी घेतली जात आहे,  ती प्रयोगशाळा या पातळी -4 रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी सक्षम नाहीये.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love