पुणे- पती जाणे आणि विधवा होने हा काही स्रीचा दोष नाही.परंतू, विधवा महीलेला समाजाने दिलेली ही भयंकर शिक्षा आहे.ती शिक्षा भोगतांना विधवा स्रियांना जो काय मनस्ताप होतो त्रास होतो त्याची कल्पना करवत नाही. पती नसेल तर त्या महीलेने घरातील सर्व कामे करणे, जेवन बनवने, देवपुजा, नोकरी, मुलांचे पालन पोषण, सासू सासरे यांची जबाबदारी, ईतर जबाबदारी, हे सर्व समाजाला चालतं,मग तीला हळदी कुंकवाचाच मान का नको? असा विचार करून पुण्यातील दामीनी बहुउद्देशीय महिला संस्थेने द्वारका पार्क येथे ‘सर्व महीला समभाव हळदी कुंकू’ हा अनोखा उपक्रम नुकताच राबवला आणि विधवा महिलांना सन्मान देऊ केला.
दामीनी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या संस्थापीका अध्यक्षा, सौ. नंदाताई जाधव या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाल्या, विधवा महीलांनाही अशा कार्यक्रमात सहभागी होता आलं पाहीजे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सुहासिनींना हळदी कुंकवाचा मान दीला जातो. परंतू, विधवा महीलांना या कार्यक्रमातुन वगळले जाते. ही समाजाने अशा महीलांना दिलेली शिक्षाच आहे. पती जाणे, महिला विधवा होने हा काही स्रीचा दोष नाही.परंतू विधवा महीलेला समाजाने दिलेली ही भयंकर शिक्षा आहे.ती शिक्षा भोगतांना विधवा स्रियांना जो मनस्ताप होतो, त्रास होतो त्याची कल्पनापण करवत नाही.
पती नसेल तर त्या महीलेने घरातील सर्व कामे करणे, जेवन बनवने, देवपुजा, नोकरी, मुलांचे पालन पोषण, सासू सासरे जबाबदारी, ईतर जबाबदारी, हे सार चालत समाजाला मग तीला हळदी कुंकवाचाच मान का नको? हे सर्व समाजाने ठरवलेले आहे.हा अन्याय आहे हा कुठे तरी थांबायला हवा म्हणून आम्ही सर्व महीलांना हळदी कुंकू देउन हा भेदभाव मिटावा आणि अन्याय अत्याचाराच्या विळख्यातुन महीलांची सुटका व्हावी त्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी दामिनीच्या पदाधिकारी पुष्पा तांबे, सपना जाधव, संगीता माळवदे,रत्नमाला आया, अल्पना देशमुख, मनीशा चव्हाण, हर्षा फडतरे,वैशाली उकीरडे, मनीषा निंबाळकर, वैशाली चव्हाण, मुंढवा केशवनगर भागातील नगर सेविका पुजा कोद्रे, केशवनगरच्या जिल्हा प. सदस्या वंदनाताई कोद्रे, आयुर्वेदिक तज्ञ डॉ.प्राजक्ता काळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सर्वांनी या विचारावर स्वागत केले.
चला तर मग आपण सर्व मिळुन ठरवुया,
विधवा महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबवू या
महीलांनी महीलांना न्याय देउ या
एक नवीन दीशा नवीन आशा….असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.