‘इंग्रजांची नीती आमची नाही’: मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही – देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही
मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही

पुणे(प्रतिनिधी)- ‘एकाचे काढून दुसऱ्याला देणे’ किंवा ‘दोन समाजांना भिडवणे’ ही इंग्रजांची नीती होती, आमची नाही. मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचे अहित होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. मराठवाड्यातील जनतेसाठी, इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे हैदराबाद गॅझेटमधील नोंदी जातीच्या प्रमाणपत्रांसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नोंदी असलेल्या पात्र व्यक्तींनाच प्रमाणपत्र मिळेल आणि ओबीसींच्या ताटातले काहीही काढून घेतले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

(While providing justice to the Maratha community, there will be no injustice to OBCs)

पुरंदर (Purandar) तालुक्यातील भिवडी (Bhivadi) येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक (Umaji Naik) यांची २३४ वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. ते म्हणाले, जोपर्यंत हे सरकार सत्तेवर आहे, तोपर्यंत ओबीसी (OBC) समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. ‘ओबीसींचे (OBC) हित करणे हेच खरे शिवकार्य आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत सरकार थांबणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
ज्यांच्याकडे वैध पुरावे आहेत त्यांनाच कुणबी (Kunbi) प्रमाणपत्र
फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा (Maratha) आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या गोंधळावर भाष्य करतना सांगितले की. मराठवाड्याच्या जनतेसाठी, जिथे इंग्रजांचे जुने रेकॉर्ड उपलब्ध नाहीत, तिथे हैदराबाद गॅझेटमधील (Hyderabad Gazette) नोंदी जातीच्या प्रमाणपत्रांसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ नोंदी असलेल्या पात्र व्यक्तींनाच प्रमाणपत्र मिळेल आणि ओबीसींच्या (OBC) आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “ज्यांच्याकडे वैध पुरावे आहेत त्यांनाच कुणबी (Kunbi) प्रमाणपत्र दिले जाईल,” असे सांगून त्यांनी कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची खात्री दिली.

अधिक वाचा  MLA disqualification case Result : एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी शिवसेना : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला  उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा निर्णय

रामोशी (Ramoshi), बेरड (Berad), बेडर (Bedar) समाजासाठी महत्त्वाकांक्षी योजना
फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणाची सुरुवात राजे उमाजी नाईक (Umaji Naik) यांना आदराने वंदन करून केली. त्यांनी रामोशी (Ramoshi), बेरड (Berad) आणि बेडर (Bedar) समाजाचा गौरवशाली इतिहास उलगडून दाखवला. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या स्वराज्य उभारणीत बहिर्जी नाईकांसारख्या (Bahirji Naik) रामोशी (Ramoshi) वीरांचे मोठे योगदान होते, ज्यांना महाराजांचा ‘तिसरा डोळा’ आणि ‘कान’ म्हणून संबोधले जायचे. मराठेशाही कमकुवत झाल्यानंतर इंग्रजांविरुद्ध पहिले बंड राजे उमाजी नाईकांनीच (Umaji Naik) केले. मात्र, इंग्रजांनी ‘क्रिमिनल ट्राईब ऍक्ट’ (Criminal Tribe Act) सारखे कायदे आणून या समाजाला गुन्हेगार ठरवून दाबण्याचा प्रयत्न केला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  छत्रपती साखर कारखान्यावर अजित पवारांची एकहाती सत्ता; 'जय भवानी माता' पॅनल विजयी!

या ऐतिहासिक योगदानाला उजाळा देत, फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली. राजे उमाजी नाईक (Umaji Naik) आर्थिक विकास महामंडळाची (Arthik Vikas Mahamandal) स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळामार्फत तरुणांना २ लाख रुपयांपर्यंत तारणमुक्त आणि १५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. तसेच, तरुणांना नोकरी मागणारे नव्हे, तर नोकऱ्या देणारे बनवण्याचे आवाहन त्यांनी केले. विशेषतः पोलीस भरतीसाठी (Police Bharti) विशेष प्रशिक्षण योजना सुरू केली जाईल, ज्यामुळे या समाजातील तरुणांना संधी मिळेल.
ओबीसी (OBC) मंत्रालयाची स्थापना आणि इतर योजना
फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसी (OBC) समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. यासाठी ओबीसी (OBC) मंत्रालय स्थापन करणार, महाज्योती (Mahajyoti) सारख्या संस्थांना अधिक सक्षम करणार, १३ वेगवेगळ्या महामंडळांना बळकटी देणार आणि ओबीसी (OBC) विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती व फी प्रतिपूर्ती योजना सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ४२ नवीन वसतिगृहे (Hostels) आणि विविध प्रशिक्षण योजनाही लवकरच सुरू होतील, असे त्यांनी जाहीर केले. “हे सरकार कोणत्याही दबावाखाली नाही, तर समाजाच्या प्रेमापोटी काम करत आहे,” असे सांगत, त्यांनी छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) मार्गावर चालत महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन राज्याची प्रगती करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love