Ramlala idol made from Krishna stone: कृष्ण शिलेपासून बनविलेल्या रामललाच्या मूर्तीचे ही आहेत खास वैशिष्ठ्ये

The special features of Ramlala idol made from Krishna stone
The special features of Ramlala idol made from Krishna stone

Ramlala idol made from Krishna stone: आपल्या लाडक्या रामललाला(Ramlalla) त्याचे घर मिळावे यासाठी शतकानुशतके वाट बघणाऱ्या श्रीराम भक्तांचे ( Devotees of Sri Ram) स्वप्न(Dream) सोमवारी(दि. 22 जानेवारी) पूर्ण झाले. अयोध्येतील(Ayodhya) राम मंदिरात(Ram Temple) श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Pranapratistha of Shri Ram Murthy) करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा विधीवत कार्यक्रम पार पडला. ‘आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥ अशी अवस्था राम भक्तांची झाली होती. देशात पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यात आली.( The special features of Ramlala idol made from Krishna stone)

श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या श्रीरामललाच्या सावळ्या मनमोहक मूर्तीने भक्तांच्या डोळ्यांची पारणे फेडली. रविवार पासूनच या मनमोहक मूर्तीचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राम भक्तांनी DP, Status ठेवत या श्रीरामावरचे प्रेम व्यतीत केले.

अधिक वाचा  #हीट अँड रन प्रकरण : धनिकपुत्राच्या पोर्शे गाडीसोबत असलेल्या दुसऱ्या गाडीत आमदाराचा मुलगा होता : नाना पटोलेंचा दावा; सीबीआय चौकशीची मागणी

रामललाची ही मूर्ती अतिशय सुंदर आहे. या मूर्तीमध्ये रामलला कपाळावर तिलक लावून अतिशय सौम्य मुद्रेत दिसत आहेत. रामलालाच्या चेहऱ्यावर हसू उमटते जे भाविकांना मोहित करते. त्यांची मूर्ती काळ्या रंगाची श्याम शिलेची आहे. या काळ्या दगडाला कृष्ण शिला म्हणतात. धर्मग्रंथात रामललाची मूर्ती ज्या कृष्ण शिलापासून बनवली गेली ती अत्यंत खास मानली जाते.

रामाच्या मूर्तीसाठी खास दगड का वापरण्यात आला?

ज्या काळ्या पाषाणातून रामाची मूर्ती बनवली आहे ती हजारो वर्षे टिकणारी आहे. पाण्यामुळे मूर्तीला इजा होणार नाही. चंदन, रोळी आदी लावल्याने मूर्तीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही सांगण्यात येत आहे.

मूर्तीची वैशिष्ट्य

रामललाच्या मूर्तीमध्ये पाच वर्षांच्या मुलाची कोमलता दिसते. या मूर्तीमध्ये बालपण, देवत्व आणि राजकुमार यांच्या प्रतिमा दिसतात. मूर्तीचे वजन सुमारे 200 किलो आहे. त्याची एकूण उंची ४.२४ फूट आहे, तर रुंदी तीन फूट आहे. पुतळा कमळाच्या फुलावर उभ्या असलेल्या मुद्रेत असून हातात धनुष्य आणि बाण आहे. मूर्ती कृष्ण शैलीत तयार करण्यात आली आहे.

अधिक वाचा  स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व समाजासाठी आदर्श पुरुष- चंद्रकांत पाटील

रामललाच्या मूर्तीवर स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्यदेव विराजमान आहेत. भगवान रामाचे हात गुडघ्याइतके लांब आहेत. डोके सुंदर, डोळे मोठे आणि कपाळ भव्य आहे. त्यांचा उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत आहे. मूर्तीमध्ये भगवान विष्णूचे 10 अवतार दिसतात. मूर्तीच्या खाली एका बाजूला रामाचे निस्सीम भक्त हनुमानजी कोरलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला गरुडजी कोरलेले आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love