दि विश्वेश्वर सहकारी बँकेला ‘शेड्युल्ड’ बँकेचा दर्जा प्राप्त

दि विश्वेश्वर सहकारी बँकेला 'शेड्युल्ड' बँकेचा दर्जा प्राप्त
दि विश्वेश्वर सहकारी बँकेला 'शेड्युल्ड' बँकेचा दर्जा प्राप्त

पुणे(प्रतिनिधि)– पुणे येथे सन १९७२ साली स्थापन झालेल्या दि विश्वेश्वर सहकारी बँकेला दि. २७ मे २०२५  रोजी रिझर्व्ह बँकेने ‘शेड्युल्ड’चा दर्जा देत एक ‘विश्वसनीय व जबाबदार बँकर” म्हणून प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे दि विश्वेश्वर सहकारी बँकेने एक ‘विश्वसनीय आणि जबाबदार बँकर’ म्हणून आपली ओळख सिद्ध केली आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांनी ही माहिती दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र मिरजे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे उपस्थित होते.

दि विश्वेश्वर सहकारी बँक ही नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात वेगाने प्रगती करणारी बँक म्हणून ओळखली जाते. २०११ मध्ये त्यांनी कर्नाटकातील निपाणी येथील दि निपाणी अर्बन सौहार्द सहकारी बँकेचे विलीनीकरण करून मल्टी-स्टेट सहकारी बँकेचा दर्जा प्राप्त केला होता.

शेड्युल्ड’ दर्जाचे अर्धशतक!

३१ मार्च २०२५ पर्यंत भारतात एकूण १४६३ नागरी सहकारी बँका होत्या, त्यापैकी केवळ ४९ बँकांना ‘शेड्युल्ड’ दर्जा मिळाला होता. दि विश्वेश्वर सहकारी बँकेला हा दर्जा मिळाल्याने आता नागरी बँकांनी ‘शेड्युल्ड’ दर्जाचे अर्धशतक गाठले आहे. विशेष म्हणजे, पुण्याला ३३ वर्षांनंतर हा दर्जा मिळाला असून, ‘शेड्युल्ड बँक’ म्हणून दर्जा मिळालेली ही पुण्यातील तिसरी बँक आहे.

अधिक वाचा  जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत : शरद पवार यांचा तूर्तास थांबण्याचा सल्ला

प्रगतीचे सातत्य आणि कठोर निकषांचे पालन

ज्या नागरी सहकारी बँकांच्या ठेवी १००० कोटींपेक्षा जास्त असतात, त्या ‘शेड्युल्ड’ बँकेचा दर्जा मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे अर्ज करू शकतात. दि विश्वेश्वर सहकारी बँकेने २०११ मध्ये या दर्जासाठी अर्ज केला होता. त्यानंतर झालेल्या एकूण १५ तपासण्यांमध्ये बँकेने प्रगतीमध्ये सातत्य राखण्याबरोबरच रिझर्व्ह बँकेच्या कठोर निकषांचे सातत्याने पालन केले, ज्यामुळे त्यांना हा बहुमान मिळाला आहे.

 दि विश्वेश्वर सहकारी बँकेची आर्थिक स्थिती (आकडेवारी कोटी रुपयांमध्ये):

तपशील३१ मार्च २०२३३१ मार्च २०२४३१ मार्च २०२५
ठेवी१७४३.८६२१३८.६२२२३०.५२
कर्जे११४१.२८१३४६.१०१५३८.३५
एकूण व्यवसाय२८८५.१४३४८४.७२३७६८.८७
भाग भांडवल४५.४८४९.०९६१.३०
भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (CRAR)१६.२५१५.२०१५.१३
ऑडीट वर्ग‘ए’‘ए’‘ए’
सभासद संख्या२३,७०५२५,९४१३०,१३६
शाखांची संख्या२८३०३०
लाभांश (डिव्हिडंट)१०%१०%१०%
अधिक वाचा  विवाह पद्धतीत आमूलाग्र बदल आणि सुनेचा छळ करणाऱ्या कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार : मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

बँकेला गेली अनेक वर्षे लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग प्राप्त झालेला आहे. तसेच, बँकेने सातत्याने RBI चे “Financially Sound and Well Managed” (FSWM) च्या सर्व निकषांचे पालन केले आहे.

शेड्युल्ड’ बँकेचे फायदे आणि जबाबदाऱ्या:

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट १९३४ च्या दुसऱ्या परिपत्रकात (II nd Scheduled) समावेश केल्याने बँकेची प्रतिमा सुधारते. तसेच, त्यांना व्यवसायाच्या अधिक संधी मिळतात, जसे की रिझर्व्ह बँकेकडून रिफायनान्सची सवलत, बँक गॅरंटीजची स्वीकारार्हता, रेमिटन्सच्या सुविधा, नगरपालिका आणि शासकीय संस्थांकडून ठेवी स्वीकारणे, हायर पर्चेसची कर्जे, परदेशी बँकांसोबत व्यवहार आणि ऑनलाइन/मोबाइल बँकिंगसारख्या आधुनिक सुविधा पुरवणे. मात्र, यासोबतच या बँकांना व्यापारी बँकांसारखेच सर्व नियम आणि कठोर बंधने पाळावी लागतात, जसे की सर्व रोख तरलता (CRR) रिझर्व्ह बँकेकडे ठेवणे आणि दर आठवड्याला विहित नमुन्यात माहिती देणे.

अधिक वाचा  रूबी हॉल क्लिनिकमधील निवासी डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

पुढील वाटचाल:

दि विश्वेश्वर सहकारी बँकेची स्थापना ७ नोव्हेंबर १९७२ रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गणेश पेठ येथे झाली. बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये पसरले आहे. सध्या रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांची चार वर्गात विभागणी केली आहे. दि विश्वेश्वर सहकारी बँक आज २२०० कोटींच्या ठेवींसह (३१ मे २०२५ अखेर) तिसऱ्या प्रवर्गात आहे. बँकेने ३१ मार्च २०२६ अखेर २५०० कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट ठेवले असून, पुढील चार वर्षांत १०,००० कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या भारतातील नागरी बँकांमध्ये स्थान मिळवण्याचा संकल्प बँकेच्या संचालक मंडळ, सभासद, सेवक आणि हितचिंतकांनी केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love