पुणे(प्रतिनिधि) : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान (Maharaja Shivchhatrapati Pratishthan) च्या वतीने पुण्यातील आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या (Shivsrushti) तिसऱ्या टप्प्याचे (Third Phase) भूमिपूजन (Bhumipujan) येत्या शुक्रवार दि. ६ जून (June 6) रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री (Union Minister of Culture and Tourism) गजेंद्रसिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा शिवसृष्टी (Shivsrushti) येथे संपन्न होईल अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त (Trustee) आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष (Shivsrushti Project Chairman) जगदीश कदम (Jagdish Kadam) यांनी कळविली आहे.(The third phase of Shiva’s creation will be celebrated on the day of Shiva’s coronation)
याविषयी अधिक माहिती देताना जगदीश कदम (Jagdish Kadam) म्हणाले, “१९६७ पासून कार्यरत असलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान (Maharaja Shivchhatrapati Pratishthan) च्या माध्यमातून कै. शिवशाहीर महाराष्ट्रभूषण (Shivshahir Maharashtra Bhushan), पद्मविभूषण (Padma Vibhushan) बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टीची (Shivsrushti) उभारणी आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) येथे २१ एकर (21 Acres) परिसरात सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology) उपयोग करून प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारीत आशियातील एकमेव ऐतिहासिक प्रकल्प (Asia’s Only Historical Project) साकारत असून शिवचरित्र (Shivcharitra) सोबतच छत्रपती शिवरायांची शिकवण (Teachings of Shivaji Maharaj), स्वधर्म (Swadharma), स्वराज्य (Swarajya), स्वभाषा (Swabhasha) यांचा प्रसार, प्रचार व्हावा या उद्देशाने हे कार्य सुरु आहे. सदर प्रकल्पासाठी ४३८.६८ कोटी (438.68 Crores) रुपयांचा खर्च अपेक्षित असून प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे (First and Second Phase) लोकार्पण (Inauguration) होऊन आजवर ५ लाख (5 Lakh) पर्यटक (Tourists), शिवप्रेमी (Shivpremi), इतिहासप्रेमी (History Enthusiasts), शाळा (Schools), महाविद्यालयाचे विद्यार्थी (College Students) यांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. आता भूमिपूजनानंतर नजीकच्या भविष्यात तिसऱ्या टप्प्याच्या (Third Phase) कामाला गती येईल.”