संघ करणार पंच परिवर्तनाने हिंदू समाजाचे आत्मरूपाचे शुद्धीकरण- रवींद्र किरकोळे

संघ करणार पंच परिवर्तनाने हिंदू समाजाचे आत्मरूपाचे शुद्धीकरण
संघ करणार पंच परिवर्तनाने हिंदू समाजाचे आत्मरूपाचे शुद्धीकरण

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वडगावशेरी भागाचा श्री विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव वाघोली येथील वि. शे. सातव शाळेच्या प्रांगणात रविवारी ०६ ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्री रवींद किरकोळे (अखिल भारतीय समरसता गतिविधि सह सयोंजक) यांनी संघाच्या शताब्दी वर्षात संघ पंच परिवर्तनाने हिंदू समाजाचे आत्मरूपाचे शुद्धीकरण करणार असल्याचे सांगितले.

या पंच परिवर्तनात १. सामाजिक समरसता, २. कुटुंब प्रबोधन , ३. पर्यावरण, ४. नागरी कर्तव्य, ५. स्वदेशी जागरण अशा पाच आयामांचा समावेशआहे. या उद्बोधनात त्यांनी संघ स्थापने मागचे संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे विचार स्पष्ट केलेत. त्यात त्यांनी म्हटले की, जर भारतात  मुस्लिम आले नसते किंवा ख्रिचन आले नसते तरीही संघाची स्थापना केली असती, कारण संघाची स्थापना कुणा धर्माविरुद्ध लढण्यासाठी नाही तर संघाचे जीवित कार्य भारतातील मूळ निवासी विघटित हिंदू समाजाला त्याच्यातील आत्म् शुध्दीकरण  करून संघटित करण्यासाठी झाली आहे.

अधिक वाचा  आयुशक्तीने पुणे शहरात आपले दुसरे क्लिनिक केले सुरू

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नानासाहेब निंबाळकर सर  यांनी आपल्या भाषणात भारतातील सामजिक विषमता दूर करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.

या उत्सवात स्वयंसेवकांकडून  सघोष संचलन, समता, दंड युद्ध, मुष्टि युद्धाचे तसेच व्यायाम योगाची शारीरिक प्रात्यक्षिक सादर करून संघ शिस्तीचे दर्शन घडविले. या कार्यक्रमाला संघाचे पं. महाराष्ट्र प्रांत सेवा प्रमुखश्री शैलेंद्र बोरकर आणि वडगावशेरी भाग कार्यवाह श्री कृष्णकांत सातव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थिती होते. एकूण २७५ स्वयंसेवक पूर्ण गणवेशात उपस्थित होते आणि ३०० च्यावर नागरिक माताभगिनी उपस्थित होत्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love