यह तो बस अंगडाई है, आगे तो लढाई है – चंद्रकांत पाटील

मुंबई – “यह तो बस अंगडाई है, आगे तो लढाई है”, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. शरद पवार यांनी जातीयतेचे राजकारण बंद करावे असा टोलाही त्यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास […]

Read More

तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – अजित पवार

पुणे- जोपर्यंत १४५ ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे तिन्ही पक्ष एकत्र आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लक्ष केले जात आहे. अशात भाजपचे […]

Read More
A university is the father of a farmer

महाविकास आघाडी सरकारनं एफआरपीच्या नियमांमध्ये बदल करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला – सदाभाऊ खोत

पुणे- महाविकास आघाडी सरकारनं ऊसाच्या एफआरपीच्या नियमांमध्ये बदल करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचं हे सरकार शेतकरीद्रोही असून या सरकारच्या विरोधात येत्या २६ फेब्रुवारीला शिर्डी रयत क्रांती संघटना व भाजप किसान मोर्चा असे संयुक्तरित्या आंदोलन करणार असल्याचा इशारा […]

Read More

येत्या मराठी भाषा दिनीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा : सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

दिल्ली(प्रतिनिधी) – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मराठी भाषिक प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारसह साहित्य अकादमीकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आमच्या मागणीचा विचार करून येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. त्यामुळे याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. मराठीला […]

Read More

वाईन दुकानात विक्रीस परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे- अमृता फडणवीस

पुणे— वाईन ही दारूच असून लहान मूले आणि महिला सुपर मार्केटमध्ये जात असतात. त्यामुळे राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवणे अयोग्य आहे. वाईन दुकानात विक्रीस परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला. राज्य सरकारने नुकताच राज्यभरातील सुपरमार्केटमधून वाईनची विक्री करता येणार असल्याचा […]

Read More
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकारने बदलला तर मला वाईट वाटण्याचे कारण नाही – शरद पवार

पुणे–सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नसल्याचे सांगत, जर अनेक स्तरातून सरकारच्या निर्णयाला विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी, त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही असे राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकारने काही […]

Read More