Yes, my soul is restless", but

सत्ता एककेंद्रीत करण्याच्या विचाराने दोघेच राज्याचा कारभार पाहत आहेत : शरद पवार यांचा टोला

पुणे—मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला केंद्र आणि राज्यातून पाठिंबा असल्याचं दिसत आहे. दोघांनीच सरकार चालवण्याला त्यांचे राज्यातील सहकारी आणि देशातील नेतृत्व या दोघांचीही संमती आहे. त्यामुळे सत्ता एककेंद्रीत करण्याच्या विचाराने दोघेच कारभार पाहत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराबाबत बोलताना लगावला. हे साहाजिक आहे. ते सत्ताधारी आहेत, […]

Read More

पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का

पुणे—पुणे जिल्ह्यात आणि पिंपरी -चिंचवड शहरात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत तर पुणे जिल्ह्यातील दोन जिल्हाप्रमुखही शिंदे गटात सामील झाले आहेत. खासदार बारणे यांचे समर्थक आणि आढळराव यांचे समर्थकही शिंदे गटात जातात की उद्धव ठाकरे यांच्या […]

Read More

एकनाथ शिंदे यांचा अजित पवारांना दणका

पुणे-राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दणका दिला आहे. नगरविकास विभागाकडून बारामती नगरपरिषदेसाठी मंजूर करण्यात आलेल्या २७० कोटींच्या निधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ३४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी एकट्या बारामती शहराला २७० […]

Read More

असं असणार शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ : काय आहे भाजपचा नवा फॉर्म्युला?

मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एकूण ४५ मंत्री असण्याची शक्यता आहे, त्यापैकी बहुतांश मंत्री हे भाजपचे असतील. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या २५ आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या १३ मंत्र्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर अपक्ष आमदारांनाही मंत्री केले जाण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री […]

Read More

राजकीय विरोधक असणारे सासरे-जावई झाले विधान परिषद आणि विधानसभेचे अध्यक्ष : राहुल नार्वेकर यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्यामागे काय आहे भाजपची खेळी?

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपचे आमदार नार्वेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून झालेल्या निवडीने एक नवा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणात घडला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधानपरिषदेची जबाबदारी जावई आणि सासरे यांच्याकडे यांच्याकडे आली असून महाराष्ट्राच्या राजकारणातील ही […]

Read More
..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागाचा भाजपाला अभिमान- चंद्रकांत पाटील

मुंबई -भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. तसेच नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान असून त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी केले. […]

Read More