कोव्हॅक्सिनसाठी खा.बापट यांचे केन्द्राला साकडे

पुणे- कोव्हॅक्सिन या भारतीय बनावटीच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी विनंती खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना केली.तसे पत्र बापट यांनी तातडीने डाॅ.हर्ष वर्धन यांना पाठविले आहे. या पत्रात त्यांनी कोव्हॅक्सिन  लसीबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. भारत बायोटेक यांनी निर्माण केलेल्या या लसी […]

Read More

खासदार बापट यांच्याकडून एक कोटी पासष्ट लाखाची मदत

पुणे : कोरोनामुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी एक कोटी पासष्ट लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत त्यांच्या खासदार निधीतून दिली जाणार असून त्यातून पुण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स व रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत.खा.बापट यांनी गुरूवारी पत्रकारांना ही माहिती दिली. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेला  ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स  मशीन खरेदी करण्यासाठी बापट […]

Read More

राज्याला कोरोना लशीचे १९.५ लाख डोस मिळणार : खा. गिरीश बापट

नवी दिल्ली-  कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुणे शहरातील लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करावी व किमान आठवडाभर पुरेल एवढा प्रतिबंधक लसीचा पुरवठा करावा. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. खा.बापट यांनी नवी दिल्ली येथे आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्राला कोविड लसीचे सुमारे साडे एकोणीस लाख डोस दिले जातील,असे आश्वासन […]

Read More

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचा पहिला तक्रार अर्ज दाखल: संजय राठोडांच्या अडचणी वाढणार

पुणे- पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरण चांगलेच तापले आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात संबंध आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. त्यातच या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमात व्हायरल  झाल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या विरुद्ध हे षड्यंत्र […]

Read More

श्रीराम मंदिराकरिता खासदार बापट मित्र परिवाराकडून ६५ लाखांचा निधी

पुणे- श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या भव्य मंदिर निर्माण श्रद्धा अभियानासाठी खासदार गिरीश बापट आणि मित्र परिवाराकडून ६५ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. हा निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांचेकडे सुपूर्त करण्यात आला. आपटे रस्त्यावरील श्रुती मंगल कार्यालयात झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्क्षा स्वरदा बापट, नगरसेवक उमेश गायकवाड, भाजप शहर […]

Read More