पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग रचनेवरुन राजकीय वातावरण तापले : चार सदस्यीय प्रभाग रचनेला शिवसेना (ऊबाठा) आणि कॉँग्रेसचा विरोध

पुण्यात चार सदस्यीय प्रभाग रचनेला शिवसेना (ऊबाठा) आणि कॉँग्रेसचा विरोध
पुण्यात चार सदस्यीय प्रभाग रचनेला शिवसेना (ऊबाठा) आणि कॉँग्रेसचा विरोध

पुणे(प्रतिनिधि)–पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग रचनेच्या आदेशावरून राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसने प्रस्तावित चार सदस्यीय प्रभाग रचनेला तीव्र विरोध दर्शवला असून, मुंबईप्रमाणेच पुण्यातही एक सदस्यीय प्रभाग रचना करण्याची मागणी त्यांनी  केली आहे. जर ही चार सदस्यीय रचना लादली गेली, तर न्यायालयात दाद मागणार असल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

प्रभागावरून विरोधकांची नाराजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुंबईप्रमाणेच पुण्यातही एक सदस्यीय प्रभाग रचना व्हावी. जर चार सदस्यीय प्रभाग रचना आमच्यावर लादली, तर आम्ही या निर्णयाविरोधात कोर्टात जाऊ. त्यांच्यासोबतच पुण्यातील काँग्रेसनेही या चार सदस्यीय प्रभाग रचनेला तीव्र विरोध केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यावर बोलताना म्हटले की, एका प्रभागात एकापेक्षा जास्त नगरसेवक असल्यास काम करणे कठीण होते. शिंदे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) हल्लाबोल करताना म्हटले की, भाजपला फक्त सत्ता भोगायची आहे आणि नागरिकांच्या समस्यांवर त्यांना काम करायचे नाही. त्यांचा या निर्णयाला विरोध असून, भाजप नेहमीप्रमाणे ‘रडीचा डाव’ खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अधिक वाचा  फडणवीस यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची शक्ति पण.. संजय राऊत

राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेमध्ये जुनेच २२७ प्रभाग कायम असून, त्या ठिकाणी एक सदस्यीय प्रभाग असणार आहेत. याव्यतिरिक्त राज्यातील इतर महापालिकांमध्ये, जसे की पुणे, नागपूर (अ वर्ग महानगरपालिका), ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड (ब वर्ग महानगरपालिका), नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली (क वर्ग महानगरपालिका) येथे तीन ते चार सदस्यीय प्रभाग असणार आहेत.

पुण्यामध्येही बहुसदस्यीय प्रभाग असून, एकूण १६२ नगरसेवक असणार आहेत, त्या हिशोबाने प्रभाग रचना करण्यात येणार आहे. ड वर्गातील महापालिकांमध्ये, जसे की अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, संगाली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना, येथे शक्यतोवर सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करण्याचे निर्देश आहेत. मात्र, सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांचा होऊ शकतो, किंवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील.

अधिक वाचा  अजित पवारांनी नावांच्या पाट्यांची अदलाबदल करत शरद पवारांच्या शेजारी बसण्याचे टाळले ..

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love