शरद पवारांची हिंदी भाषेवर भूमिका : सक्ती नको आणि द्वेषही नको

शरद पवारांची हिंदी भाषेवर भूमिका : सक्ती नको आणि द्वेषही नको
शरद पवारांची हिंदी भाषेवर भूमिका : सक्ती नको आणि द्वेषही नको

पुणे(प्रतिनिधी) — “हिंदी भाषेची (Hindi Langauge Compulsion) सक्ती असू नये.”मात्र, त्याचवेळी “हिंदी भाषेचा द्वेष करणे हे विद्यार्थ्याच्या हिताचे नाही” अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. मुलांना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या इच्छेनुसार भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य असावे. हिंदी शिकण्यास कोणी येत असेल, तर त्याला नाही म्हणण्याचे कारण नाही असेही त्यांनी बारामती (Baramati) येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्य सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (National Education Policy) मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध झाला होता. त्यानंतर, राज्य सरकारने ‘अनिवार्य’ (Compulsory) हा शब्द काढून २० पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकता येतील असे नवीन जीआर (GR – Government Resolution) काढले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena – MNS) हिंदी लादल्यास वाईट परिणाम होतील असा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “हिंदी भाषेची सक्ती असू नये”. मात्र, त्याचवेळी त्यांनी हे देखील नमूद केले की, “हिंदी भाषेचा द्वेष करणे हे विद्यार्थ्याच्या हिताचे नाही”. पवारांनी सांगितले की, “शेवटी त्यांना हवे आहे ते त्यांनी करावे. पालकांनी मार्गदर्शन करावे”. हिंदी शिकण्यास कोणी येत असेल, तर त्याला नाही म्हणण्याचे कारण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पवारांनी हिंदी भाषेच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, “संबंध हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे, त्यातील जवळपास ५५ ते ६० टक्के लोक हिंदी बोलतात”. त्यामुळे “सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही” असेही त्यांनी अधोरेखित केले.

अधिक वाचा  पैशाच्या हव्यासापायी वैष्णवीचा बळी: हुंड्यासाठी सासरच्यांकडून अमानुष छळ: पित्याचा आक्रोश

राजकीय आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार साधारणतः तीन महिन्यांच्या आत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे. पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party), काँग्रेस (Congress), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena) आणि शेतकरी कामगार पक्ष (PWP – Peasants and Workers Party) हे सर्व घटक एकत्र बसून आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत विचार करतील. विशेषतः मुंबईमध्ये (Mumbai) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi – MVA) म्हणून एकत्रच निवडणूक होईल, जिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अधिक शक्तीस्थान आहे हे विचारात घेतले जाईल. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त ‘ठाकरे ब्रँड’ (Thackeray Brand) संपवण्याचा विरोधकांकडून प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते. याबाबत विचारले असता त्याबाबत मला माहिती नाही असे उत्तर त्यांनी दिले.

अधिक वाचा  प्रत्येकाला घर देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल - देवेंद्र फडणवीस : ग्रामीण भागात ८० हजार कोटींची गुंतवणूक होणार

पवार यांनी एआय तंत्रज्ञानासंदर्भात (AI Technology) आयोजित महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे कौतुक केले. या कार्यशाळेमुळे शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी, खताचा खर्च कमी करण्यासाठी आणि पाणी कमी वापरण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होईल असे त्यांनी सांगितले. त्यांनी मुला-मुलींना तंत्रज्ञानाचे ज्ञान घेण्याची संधी मिळाली पाहिजे यावर भर दिला.

 

राज्यातील पावसाच्या स्थितीवर बोलताना, चांगला पाऊस झाल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल आणि वर्षभर पाण्याची चिंता राहणार नाही अशी स्थिती आहे असे पवार यांनी नमूद केले. काही ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झाले असले तरी, ही पावसाळ्याची सामान्य बाब असून, अशावेळी सरकारने त्यांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Cooperative Sugar Factory) निवडणुकीच्या रणधुमाळीत समोर आलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Cooperative Bank – PDCC Bank) गैरव्यवहाराच्या आरोपांवरही शरद पवारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. विरोधी गटाचे नेते रंजन तावरे (Ranjan Taware) यांनी आरोप केला होता की, बारामतीतील आमराई भागातील पीडीसीसी बँकेची शाखा रात्री अकरापर्यंत सुरू होती. त्या ठिकाणी काही खासगी लोक आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या उपस्थित होत्या, असा तावरे यांचा दावा आहे, आणि त्यांनी आचारसंहिताभंगाची तक्रारही केली आहे.

अधिक वाचा  जून नंतर लसीचा तुटवडा संपेल - देवेंद्र फडणवीस

यावर भाष्य करताना शरद पवार यांनी बँकेच्या नेतृत्वावर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “बँकेचे नेतृत्व करणारे जे लोकं आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी बँक कशाला उघडेल?”. पवारांनी ही बाब दुसऱ्यांदा घडत असल्याचे निदर्शनास आणले. त्यांनी आठवण करून दिली की, लोकसभा निवडणुकीच्या वेळीही पीडीसीसी बँकेची वेल्हे (Velhe) तालुक्यातील शाखा रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत उघडी होती. त्यावेळी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करून आरोप केले होते आणि शाखाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. पवार म्हणाले, “रात्री दोन आणि बारा वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते, याचा अर्थ काय समजायचा तो समजून घ्या”.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्वतः उमेदवार असून बारामतीत तळ ठोकून आहेत. याबद्दल विचारले असता, शरद पवारांनी “हा प्रश्न तुम्ही अजित पवारांनाच विचारा,” अशी प्रतिक्रिया दिली.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील (Karnataka-Maharashtra Border Issue) समितीमध्ये आपला समावेश झाल्याबद्दल आपल्याला माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र, सीमा प्रश्नाबाबत अहमदाबादमध्ये (Ahmedabad) झालेल्या विमान अपघाताबाबत बोलताना, तो सायबर हल्ला असावा असे वाटत नाही, असे पवारांनी नमूद केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love