पुणे : दिग्दर्शक सुमित कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखालील नव्या हिंदी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले. या चित्रपटाचे नाव आहे “संगी” (ए फ्रेंड इन नीड इज़ ए फ्रेंड इंडिड). हा चित्रपट रोहन भोसले आणि पिंटू साव यांच्या बॅनरखालील यंत्रणा फिल्म्स आणि आर्मोक्स फिल्म्सच्या सहकार्याने बनत असून, पिकल एंटरटेनमेंट यांनी चित्रपटाचे वितरण करणार आहेत.
या चित्रपटात प्रसिद्ध यूट्यूबर अरुण प्रभुदेसाई, मोनिका प्रभुदेसाई आणि प्रतीक ठाकूर हे देखील प्रथमच चित्रपट निर्माती शेत्रात पदार्पण करीत आहेत.
या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात शारीब हाशमी, गौरव मोरे, श्यामराज पाटील, विद्या मालवदे आणि संजय बिश्नोई यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा तीन मैत्रींच्या बंधनावर आधारित असून, त्यांच्यातील नातेसंबंधांची सुंदर आणि गमतीशीर कहाणी पडद्यावर साकारण्यात येणार आहे. चित्रपटाच्या बाकीच्या माहितीची वाट पाहत असताना, या पोस्टरने नक्कीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे