पुणे (प्रतिनिधी): देशातील वेगाने वाढणाऱ्या स्मार्टफोन ब्रँड्सपैकी एक असलेल्या रियलमीने आज पुण्यात त्यांच्या रियलमी १५ (Realme 15) आणि रियलमी १५ प्रो (Realme 15 Pro) या नवीन स्मार्टफोनची अधिकृत घोषणा केली. तरुण ग्राहक, कंटेंट क्रिएटर्स आणि फोटोग्राफी प्रेमींना लक्ष्य करून हे फोन बाजारात आणले आहेत. रियलमीच्या मते, हे नवीन स्मार्टफोन अत्याधुनिक कॅमेरा (Advanced Camera), एआय फीचर्स (AI Features) आणि स्लीक डिझाइनसह (Sleek Design) ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतील.
रियलमीचे भारतातील वितरण प्रमुख कपिल बेहल (Kapil Behal) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, रियलमी १५ मालिका बाजारात आपले वेगळे स्थान निर्माण करेल. बोरा मल्टीकॉर्प (Bora Multicorp) व्यवस्थापकीय संचालक प्रशांत बोरा (Prashant Bora) यांनी रियलमी १५ प्रो मधील ५०+५०+५० एमपी ट्रिपल कॅमेरा सिस्टीम (50+50+50 MP Triple Camera System), ४के ६० एफपीएस (4K 60 FPS) व्हिडिओ रेकॉर्डिंग क्षमता आणि ‘लिव्ह रियल इन एव्हरी शॉट’ (Live Real in Every Shot) या टॅगलाइनवर भर दिला. रियलमी इंडियाचे क्यूब रिसोर्स ऑर्केस्ट्रेटर (केआरओ) प्रमुख संतोष सिंग, रियलमीचे महाराष्ट्राचे झोनल सेल्स मॅनेजर असलेले मयूर अपूर्वा, बोरा मल्टीकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत बोरा, उपाध्यक्ष अमित सिंग हे देखील यावेळी उपस्थित होते. मुंबई व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रासाठी पुण्यातील बोरा मल्टीकॉर्पची सुपर एजंट म्हणून नियुक्ती देखील यावेळी जाहीर करण्यात आली.
रियलमी १५ प्रो मध्ये जनरेशन ४-स्नॅपड्रॅगन ७ (Generation 4-Snapdragon 7) नवीन चिपसेट (Chipset), सर्वात स्लिम ७००० mAh बॅटरी (7000 mAh Battery), ६५०० निट्स कर्व्ह एमोलेड डिस्प्ले (6500 Nits Curved AMOLED Display) आणि AI एडिट स्मार्ट जिनी (AI Edit Smart Genie) यांसारखी वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे ‘प्रो’ मालिकेची नव्याने व्याख्या केली जात असल्याचे कंपनीने म्हटले. रियलमी १५ हे मॉडेल हलके, आकर्षक आणि दैनंदिन मल्टीटास्किंगसाठी योग्य असल्याचे अमित सिंग (Amit Singh) यांनी नमूद केले.
रियलमी इंडियाचे क्यूब रिसोर्स ऑर्केस्ट्रेटर (केआरओ) प्रमुख संतोष सिंग (Santosh Singh) आणि महाराष्ट्राचे झोनल सेल्स मॅनेजर मयूर अपूर्वा (Mayur Apurva) हे देखील यावेळी उपस्थित होते. तसेच, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी पुण्यातील बोरा मल्टीकॉर्पची सुपर एजंट (Super Agent) म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
प्रशांत बोरा यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे रियलमीसाठी महत्त्वाचे राज्य असून डिजिटल दरी भरून काढण्यासाठी प्रत्येक घरापर्यंत स्मार्टफोन पोहोचवणे हे त्यांचे ध्येय आहे. रियलमी १५ मालिका लवकरच ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर (Online and Offline Platforms) आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध होईल.