राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन होईल व मनसेही महायुतीत सहभागी होईल : दीपक केसरकर

राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन होईल व मनसेही महायुतीत सहभागी होईल
राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन होईल व मनसेही महायुतीत सहभागी होईल

पुणे(प्रतिनिधि)–उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत फार मोठ षड्यंत्र रचले जात आहे. खरे तर मराठा समाजाचे आरक्षण फडणवीस यांनीच दिले व टिकवले. महाविकास आघाडीने ते आरक्षण घालवले. मात्र, आम्ही दिलेले आरक्षण हे टिकणारे असून, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन होईल व मनसेही महायुतीत सहभागी होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे शालेय शिक्षण विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, की मारने से बचाने वाला बडा होता है. वाचवणारा हा देव असतो आणि मारणारा हा माणूस असतो आणि मारणाऱयांपेक्षा तारणारा हा मोठा असतो. मनोज जरांगे पाटील हे सेन्सिटिव्ह असून त्यांच्याशी बोलले पाहिजे. त्यांच्या लोकप्रियतेचा वापर अन्य मंडळी घेत आहेत. त्यांचा बळी देण्याचा प्रयत्न होत आहे.

अधिक वाचा  भाजयुमोच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळेच सरकारची जिम उघडण्याची तयारी : विक्रांत पाटील

न्यायालयीन प्रक्रिया ही बराच काळ चालत असते. एक व्यक्ती लोकशाहीत निर्णय घेऊ शकते का? कोणताही निर्णय घेताना पक्षाची बैठक बोलावली पाहिजे. पण असे झालेले नाही. आम्हाला यातून सुटायचे असते, तर आम्ही सहज दुसऱया पक्षात गेलो असतो किंवा दुसरा गट तयार केला असता. पण आम्ही हे केलेले नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी आमची ही लढाई आहे. आमदारकी पणाला लावून आम्ही लोकशाहीची ही लढाई लढत आहोत आणि यात आम्हाला यश येईल, याची शंभर टक्के खात्री आहे. आज जे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार म्हणत आहेत, त्यांनी आरशात पहावे, असे उत्तर केसरकर यांनी आमदार अपात्रेबाबतच्या न्यायालयीन लढाईबाबत बोलताना केले.

राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन होईल

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मदत केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभेत स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, की अजून निवडणुकीला उशीर आहे. प्रत्येक पक्ष हा सर्व जागांची तयारी करत असतो. आमची महायुती असून,  मागच्या वेळी राज ठाकरे यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांचे शिंदे साहेब तसेच फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत. म्हणून जेव्हा त्यांच्याशी बोलणे होईल तेव्हा नक्कीच त्यांचे मतपरिवर्तन होईल, अशी अपेक्षा केसरकर यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  पुणे शहर युवक काँग्रेस चिटणीसपदी यश गोरडे यांची नियुक्ती

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love