Attack On Ayodhya By Aurangzeb : आपल्या भावाला मारून व पित्याला कैदेत टाकून दिल्लीचे तख्त बळकावल्यानंतर औरंगजेबाने (Aurangzeb) अयोध्या(Ayodhya), काशी(Kashi) आणि मथुरेकडे (Mathura) मोर्चा वळवला. आपला अत्यंत विश्वासू सरदार फिदाई खानवर (Fidai Khan) त्याने अयोध्येची कामगिरी सोपविली. सन १६६० मध्ये फिदाई खानने अयोध्येवर पहिला हल्ला केला पण, शीख सैनिक (Sikh soldiers) तसेच चिमटाधारी साधू यांनी फिदाई खानच्या सैन्याचा कडवा प्रतिकार केला व हे आक्रमण हाणून पाडले. हा हल्ला फसल्यानंतर फिदाई खाननेही अधिक तयारी करून दुसरा हल्ला केला, यामध्ये मात्र तो यशस्वी झाला.(Plan of attack on Ayodhya by Aurangzeb)
रामजन्मभूमीवरील (Ram Birthplace) मंदिराचे नुकसान करण्यातही त्याला यश मिळाले पण त्या जागेवर मशीद (Mosque) उभारणे काही त्याला शक्य झाले नाही. असंख्य हिंदूंनी आपले रक्त सांडले पण आपला रामजन्मभूमीवरील हक्क हिंदूंनी कधीच सोडला नाही. रामजन्मभूमीवरील मंदिराचे नुकसान झाल्यानंतर हिंदूंनी परत – परत ते मंदिर उभे करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मंदिर उभारता आले नाही, तेव्हा तेथे चबुतरा बांधला व त्याची पूजा केली. परंतु तो चबुतराही औरंगजेबाने जेव्हा काढून टाकला, तेव्हा त्या खड्ड्यात फुले व अक्षता वाहून रामजन्मभूमीची हिंदू समाज पूजा करतच राहिले. पुढच्या काळात औरंगजेब मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी दख्खनमध्ये उतरला, तेव्हा मात्र रामजन्मभूमीवरील हिंदूंचा वावर पूर्वीप्रमाणे सुरू झाला.
संकलन – डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर.
मो.क.७५८८२१६५२६