पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग ६)

पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास

वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या परम पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या पंढरपूर या नगरीचेही महात्म्य निराळेच आहे. पंढरपूर हे कधी वसले गेले किंवा ते कधीपासून अस्तित्वात आहे? याबाबतची उत्सुकता अनेकदा व्यक्त होते.

॥ जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर ॥

असे जरी म्हटले जात असले तरी पंढरपूर हे स्थान इसवीसनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकापासून ओळखले जाते, या स्थानाला लोहान क्षेत्र, पौंडरिक क्षेत्र, पंडरंगे, पांडुरंग पल्ली, पांडुरंगपूर, विठ्ठलवाडी, भांडरंग वट्टीग, फागनीपूर, पंढरी, पंढरपूर या विविध नावांनी ओळखले जाते, त्याच बरोबर शैवक्षेत्र महायोगपिठ म्हणून देखील इसवीसनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात हे स्थान प्रसिद्ध होते. अशा या पंढरी नगरीच्या ओढीने समस्त वारकरी व विठ्ठल भक्त पंढरीच्या वारीमध्ये चालताना दिसून येतात.

अधिक वाचा  ‘मेल टू महात्मा’ विनंती पत्राचा अभिनव उपक्रम : विश्वशांतीसाठी सर्व राष्ट्रप्रमुख, युनेस्को व यूनोला करणार आवाहन

वारकऱ्यांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल या देवतेला विठ्ठल हे नाव कसे प्राप्त झाले, विठ्ठल या शब्दाची व्युत्पत्ती काय?

१) विष्णू – विष्ट – विठू- विठ्ठल अशी व्युत्पत्ती दाखविली जाते.

२) इटु – कटिकरन्यस्त-कमरेवर हात ठेवलेला देव असा तामिळी भाषेतील शब्द आहे, त्यावरून झटु – इठु- इटुबा -इठुबा -विठोबा ही एक व्युत्पती.

३) धर्मसिंधूकार बाबा पाध्ये यांच्या मते, वि दा ज्ञानेन, ठा ण शुन्यात, ला ति गुहाती म्हणजे ज्ञानाने जे शून्य आहेत म्हणजेच जे अज्ञानी आहे त्यांचेही ग्रहण करणारा म्हणजे त्यांनाही आपले पायाशी आश्रय देणारा तो विठ्ठल.

४)पुंडलिकाच्या प्रचलित कथेतील अख्यायिकेवरून विटेवर उभा तो विठोबा.

५) विचा केला ठोबा तोचि झाला विठोबा II

अधिक वाचा  सत्ता जाणार या धास्तीने भाजप शिर्ष नेतृत्वास मराठी भाषा आठवली व अभिजात दर्जा देण्याचे पुण्य केले : गोपाळदादा तिवारी

श्री संत तुकाराम महाराज, विवाहन म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे स्थिर, असे म्हणतात. याचाच अर्थ ज्याचे गरुड वाहन या चंद्रभागेच्या तिरी स्थिर स्तब्ध म्हणजे स्थिर झाले, तो विठोबा.

अशा अनेक व्युत्पत्ती आपल्याला सापडतील, परंतु यामध्ये न अडकता वारकरी मात्र श्रद्धेने या देवतेला विठोबा माऊली म्हणून संबोधतात व त्याच्याच नामाचा उच्चार करतात.(क्रमशः)

  –डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

        मो.क्र. ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love