पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चित्तमपल्ली यांचे निधन

मारुती चित्तमपल्ली यांचे निधन
मारुती चित्तमपल्ली यांचे निधन

सोलापूर : निवृत्त वनाधिकारी, अरण्यऋषी, पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चितमपल्ली (Maruti Chittampalli) यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे.

30 एप्रिल 2025 रोजी मारुती चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने ( Padma Shri award) सन्मानित करण्यात आले होते. दिल्लीवरून पद्मश्री पुरस्कार घेवून आल्यावर ते बेड रेस्टवर होते.

त्यांचे वास्तव्य अक्कलकोट रोडवरील सूत मिल हेरिटेज, मनिधारी एम्पायर सोसायटी येथे होते. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. १९ जून रोजी दुपारी १ वाजता राहत्या घरापासून निघणार असून रूपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांच्या पश्चात भावजय, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला होता व केवळ दूध व थोडेसे पाणी घेत होते.

अधिक वाचा  एमआयटी एडीटी विद्यापीठात 'टॅलेंट फ्यूजन' उत्साहात

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love