लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडेदहा हजारहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी

ore than ten and a half thousand employees and officials in the wake of the Lok Sabha elections
ore than ten and a half thousand employees and officials in the wake of the Lok Sabha elections

पुणे– लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली अहे. त्यानुसार तब्बल १० हजार ५०० हून अधिक कर्मचारी, अधिकार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये  ९३० अधिकार्‍यांचा समावेश असून, १० मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे निश्चित केले आहे. त्याठिकाणी पोलिसांचा  अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पुणे पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्ताची आखणी केली आहे. त्यानुसार कायदा सुव्यवस्थेसह शांततापुर्ण वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.  दरम्यान, प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचे नेतेमंडळी शहरातील विविध भागात रॅली, प्रचारासाठी उपस्थित राहणार आहे. त्यानुसार जाहीर सभा, अतिमहत्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्ताची आखणी केली आहे. बंदोबस्तासाठी साडेदहा हजार पोलीसांसह   ९३० अधिकार्‍यांचा फौजफाटा  तैनात केला जाणार आहे.  पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत पुणे लोकसभा मतदारसंघासह, शिरुर, बारामती लोकसभा मतदार संघाचा काही भाग समाविष्ठ आहे. बारामती मतदार संघात ७ मे रोजी मतदान होणार आहे.  संबंधित मतदारसंघात खडकवासला, पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा काही भाग आहे.

अधिक वाचा  सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज भरणार : दोन्ही बाजूने शक्ति प्रदर्शन होणार

बारामती मतदारसंघातील काही भाग पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी तेथे ३७० पोलीस अधिकारी, साडेतीन हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे ४७५ जवान, निमलष्करी दल आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रत्येकी दोन तुकड्या असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात १३ मे रोजी पुणे लोकसभा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदान होणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील काही शिरूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. १३ मे रोजी तेथे ५६० पोलीस अधिकारी, सात हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षकदलाचे १ हजार ९०० जवान, निमलष्करी दलाच्या तीन तुकड्यांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात ठेवण्यात येणार आहेत.

कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून विशेष खबरदारी

कायदा सुव्यवस्था आणि जातीय सलोखा राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने स्थानिक पोलिसांकडून रूटमार्च, पेट्रोलिंगवर भर दिला आहे. दरम्यान, निवडणुकीत मतदान होईपर्यत पोलिसांना दक्षता घ्यावी लागणार आहे. तत्पुर्वी कोम्बिंग ऑपरेशन, सराईतांची हजेरी, तडीपार आरोपींची धुंडाळणी करण्यासाठी प्लॅनिंग करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love