महात्मा गांधी जयंतीनिमित्त अरविंद एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी राबविले ‘शाळा स्वच्छता अभियान

महात्मा गांधी जयंतीनिमित्त अरविंद एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी राबविले 'शाळा स्वच्छता अभियान
महात्मा गांधी जयंतीनिमित्त अरविंद एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी राबविले 'शाळा स्वच्छता अभियान

पिंपरी(प्रतिनिधी) : जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शाळेचे वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छ करीत स्वच्छता अभियानाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय विद्यानिकेतच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, प्रिती पाटील, भटु शिंदे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अधिक वाचा  मी स्वतःच माझा आयडॉल : नेमबाजपटू स्वप्निल कुसाळे याचे मत

विद्यार्थ्यांनी शाळा व शाळेचा परिसरची स्वच्छता  करून स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेतले. तसेच ‘स्वच्छ शहर, आनंदी शहर’, ‘गांधीजी का एकच नारा, स्वच्छ भारत देश हमारा’ या घोषणा दिल्या. तसेच ‘रिस्पेक्ट’ (आदर) ही नाटिका सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी वाचन उपक्रमही आयोजित करण्यात आला होता.

शिक्षिका सुनिता ठाकुर, मंगल जाधव, सुषमा शिरावले, रिमा पवार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

संस्थेच्या अध्यक्षा आरती राव म्हणाल्या, की आपल्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ राखला पाहिजे. त्यामुळे मन नेहमी प्रसन्न राहते. प्रणव राव यांनी अहिंसा व सत्य पालन यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नेहमी खरे बोलावे, म्हणजेच गांधीजींच्या सत्य या गुणाचे आचरण करावे.

अधिक वाचा  अनुसूचित जाती वर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची राज्य सरकारने तत्काळ अंमलबजावणी करावी — भास्कर नेटके

सूत्रसंचालन शिक्षिका मंगल जाधव यांनी, तर शिक्षिका संजीवनी बडे यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love