ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा पद्म पुरस्काराने सन्मान व्हावा : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांशी चर्चा

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा पद्म पुरस्काराने सन्मान व्हावा :
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा पद्म पुरस्काराने सन्मान व्हावा :

पुणे(प्रतिनिधी) : ‘स्वतंत्र भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून भारतीय कुस्तीला नवी उंची मिळवून देणारे पै. स्व. खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली.

यावेळी स्व. खाशाबा जाधव यांच्या कुस्तीसाठीच्या योगदानाची माहिती तसेच महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेबद्दलची माहिती मोहोळ यांनी मांडविया यांना दिली.

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘खाशाबा जाधव यांनी देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून स्वतंत्र भारताचे ऑलिम्पिकचे खाते उघडले. केवळ कुस्तीच नाही, तर संपूर्ण क्रीडा विश्वासाठी हा प्रेरणादायी क्षण होता. अतिशय खडतर परिस्थितीत आणि संघर्ष करत खाशाबा जाधव यांनी मिळवलेले यश दीपस्तंभ ठरले. त्यांच्या या यशाचा गौरव नागरी सन्मानाने होणे आवश्यक वाटते. म्हणूनच या संदर्भात मांडविया यांच्याशी चर्चा केली’.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  धक्कादायक: का गेले उद्योजक पाषाणकर घर सोडून?