पुण्यात 12 लाखांचे मेफेड्रोन जप्त : गुलबर्ग्याच्या आरोपीस अटक

ण्यात 12 लाखांचे मेफेड्रोन जप्त
पुण्यात 12 लाखांचे मेफेड्रोन जप्त

पुणे(प्रतिनिधि)-पुण्यातील बुधवार पेठेत (Budhwar Peth) मेफेड्रोन (Mephedrone) विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) अटक केली आहे. त्याच्याकडून 12 लाख 12 हजार रुपयांचे 59 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

शरणप्पा नागप्पा कट्टीमणी (Sharannappa Nagappa Kattimani) (वय 34, रा. दुगड शाळेजवळ, कात्रज (Katraj), मूळ रा. भापर गल्ली, गुलबर्गा (Gulbarga), कर्नाटक (Karnataka)) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्री प्रतिबंध कायद्यान्वये (NDPS Act) फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेत अमली पदार्थ विरोधी पथक (दोन) गस्त घालत होते. त्या वेळी कट्टीमणी हा मेफेड्रोन (MD) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी सय्यद साहिल नजीर शेख (Sayyad Sahil Nazir Shaikh) यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून कट्टीमणीला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे मेफेड्रोन सापडले. त्याच्याकडून 12 लाख 12 हजार रुपयांचे मेफेड्रone जप्त करण्यात आले. कट्टीमणीने मेफेड्रोन कोणाकडून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

अधिक वाचा  रोहित पवार म्हणतात भाजपचाच मुख्यमंत्री होणार : त्यांच्यामते फडणवीस नव्हे तर हे होणार मुख्यमंत्री...

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख (Pankaj Deshmukh), उपायुक्त निखिल पिंगळे (Nikhil Pingale), सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक (Rajendra Mulik) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड (Sudarshan Gaikwad), सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक (Nitinkumar Naik), उपनिरीक्षक अस्मिता लाड (Asmita Lad), चेतन गायकवाड (Chetan Gaikwad), मयूर सूर्यवंशी (Mayur Suryawanshi), साहिल शेख (Sahil Shaikh), उदय राक्षे (Uday Rakshe), संदीप शेळके (Sandeep Shelke) यांनी ही कारवाई केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love