पवारांचं सरकार येईल तेव्हा मराठा आरक्षण गायब होईल- अमित शहा

पवारांचं सरकार येईल तेव्हा मराठा आरक्षण गायब होईल
पवारांचं सरकार येईल तेव्हा मराठा आरक्षण गायब होईल

पुणे – आम्ही २०१४ ला मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्यानंतर सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. पवारांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं, शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जातं”, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

“मी आज शरद पवारांना सांगायला आलोय, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व उत्तर देत आहेत. पण माझं लांबून एक निरीक्षण आहे, ते मी आता तुमच्यासमोर सांगत आहे, महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा भाजपचं सरकार येतं, मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि जेव्हा-जेव्हा शरद पवार यांच्या आघाडीचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं. मी विचार करुन हे वाक्य बोलत आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपचं सरकार आलं. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं. मध्यंतरी शरद पवार यांचं सरकार आलं, मराठा आरक्षण गायब झालं. आम्ही पुन्हा आलो. आम्ही आतासुद्धा मराठा आरक्षण देण्याचं काम केलं आहे. शरद पवार यांचं सरकार येईल, तेव्हा मराठा आरक्षण पुन्हा गायब होईल. मराठा आरक्षण कायम ठेवायचं असेल तर कुणाचं सरकार आणलं पाहिजे? समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम भाजपने केलं आहे”, असे शहा म्हणाले.  लोकसभा निवडणुकीची सर्व कसर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भरून काढा. आगामी निवडणुकीमध्ये मोठं यश मिळेल आणि राज्यात प्रंचड बहुमतात युतीचे सरकार येईल, असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी शरद पवारजी माझा कार्यकर्ता हुशार झाला आहे. त्याला तुमच्या खोट्या प्रचाराची जाणीव झाली आहे. आता तुमचा खोटा प्रचार चालणार नाही. घरोघरी जावून या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करायचा आहे. हे खोटं बोलणार आणि भ्रम निर्माण करतील. प्रत्येक कार्यकर्ता हा कमळासाठी समर्पित व्हावा. प्रत्येक कार्यकर्त्याने कमळाला जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी”, अशा सूचना अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.

“विरोधक म्हणाले, भाजप आरक्षण संपवत आहे. आम्ही उत्तर देताना काही ठिकाणी संकोच करत होतो. लोकांच्या मनात भ्रम निर्माण झाला. मी आज सांगायला आलो आहे की, १० वर्षांचे एक्स्टेन्शन नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मिळालं आणि पूर्ण बहुमत असतानाही आरक्षणाला बळ देण्याचं काम आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. विरोधकांनी संविधानाचा विषय काढला. आम्ही उत्तर दिलं. आता निवडणूक महाराष्ट्रात आली आहे. आता नव्यानव्या प्रकारचे गैरसमज शरद पवार उभे करत आहेत”, असा आरोप अमित शाह यांनी केला.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील औरंगजेब फॅनक्लबचे नेते - अमित शहा
अधिक वाचा  शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार (सरगना) आहेत हे मी ‘डंके की चोट पर’ सांगतो- अमित शहा
अधिक वाचा  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार असेल -अमित शहा : मुख्यमंत्री भाजपचा असण्याचे दिले संकेत
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love