मालपाणीज् बेकलाईटच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त उपवासाचे नवीन उत्पादने सादर

मालपाणीज् बेकलाईटच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त उपवासाचे नवीन उत्पादने सादर
मालपाणीज् बेकलाईटच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त उपवासाचे नवीन उत्पादने सादर

पुणे: मालपाणीज् बेकलाईट या विश्वासप्राप्त फूड ब्रँडने नवरात्रोत्सवाचा शुभ मुहूर्त साधून उपवासाचे तीन उत्पादने सादर करण्याची घोषणा केली. उत्पादनांच्या या नव्या श्रेणीमध्ये बटाटा चिवडा (हिरवी मिरची), बटाटा चिवडा (लाल मिरची) आणि साबुदाणा चिवडा यांचा समावेश आहे.

मालपाणीज् बेकलाईटमध्ये रोजच्या फराळासाठी खास तयार केलेला उपवास चिवडा आहे. शुद्ध शाकाहारी कारखान्यात ते बनविले जातात, सोयीस्करपणे पॅक केले जातात, त्यात ताजेपणा आणि कुरकुरीतपणा टिकवून ठेवला जातो. काळे मीठ वापरून ते तयार केले जातात, ते पचायला हलके आणि कमी तेलकट असतात.

गोड आणि तिखट यांचे मिश्रण असलेला हा बटाट्याचा किस चिवडा कुरकुरीत बटाट्याचा किस आणि शेंगदाणे घालून तयार करण्यात येतो. हिरवी मिरची, पिठीसाखर आणि काळे मीठ, पेरलेला हा कोणत्याही वेळी चालणारा उपवासाचा नाश्ता आहे.

अधिक वाचा  आयसीएआय पुणे शाखेचा हीरक महोत्सव व ७४ वा सीए दिन विविध उपक्रमांनी साजरा

उपवासाच्या वेळी चविष्ट खाण्याची इच्छा होते तेव्हा सतत खावा असा हा साबुदाणा चिवड्याचा फराळ आहे. हलक्या आणि कुरकुरीत साबुदाणा आणि कुरकुरीत बटाट्याचा कीस वापरून चिवडा तयार केला जातो., ज्यामुळे चिवड्याची चव वाढते.

लाल मिरची बटाटा चिवडा हा एक तिखट चिवडा असून तो कुरकुरीत बटाट्याच्या कीस  आणि शेंगदाणे घालून बनवला जातो. त्यावर लाल मिरचीचे तिखट पेरलेले असते. ही सर्व चिवडा उत्पादने पुणे, पीसीएमसी, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि उर्वरित महाराष्ट्रात उपलब्ध आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love