पुणे : पुनीत बालन गृप आणि इंस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स यांचा सहकार्याने शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित राष्ट्रीय सब ज्युनिअर ज्यूदो स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राला तीन कांस्यपदकांची कमाई झाली आणि वैशिष्ट्य म्हणजे ही तिनही कांस्यपदके यवतमाळ जिल्ह्याच्या खेळाडूंनी पटकावली. राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धा बाल क्रीडापटूनच्या नैपुण्याने गाजला. 30 किलो गटातील वेदांत पारधी 28 किलोमधील पौर्णिमा सातपुते आणि 36 किलो खालील गटात राजवी तळोकार या तीन खेळाडूंनी महाराष्ट्राचे नाव पदक तालिकेत कोरले.
30 किलोच्या गटातील वेदांतने एकूण पाच सामने खेळले परंतु हरियाणाच्या खेळाडू बरोबर ताकदीच्या अभावामुळे त्याला हार पत्करावी लागली रिप-चार्ज राऊंडमध्ये मणिपूरच्या कसलेल्या खेळाडूला पराजित करून कांस्यपदकावर वेदांतने आपला अधिकार कायम केला. 28 किलो खालील गटात खेळणाऱ्या पौर्णिमाने प. बंगालच्या खेळाडूला आक्रमकतेने डाव मारण्याचा प्रयत्न केला पण गणित चुकल्याने ती नेवाजा या प्रकारात अडकली आणि तिला हार पत्करावी लागली परंतु नंतर तिने उसळी मारून यूपीच्या खेळाडूला पराजित करून कांस्यपदक मिळवले.
वेदांत आणि पौर्णिमा हे यवतमाळला रवी भूषण कदम यांच्याकडे सराव करतात तर 36 किलो खालील गटात खेळणारी राजवी हिला जय खोडके यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राजवीने मिझोराम, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील खेळाडूंना हरवत सुवर्णाकडे मार्गक्रमण करत असतानाच हरियाणा बरोबर तिचा अश्वमेध थांबला गेला आणि त्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
उद्या सायंकाळी या स्पर्धांचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ आयोजित होईल. दरम्यान स्पर्धेतील विजेता, उपविजेता संघ यासह या सर्वोत्तम महिला खेळाडूसाठी “स्वर्गीय आमदार सौ मुक्ता टिळक स्मृतीप्रित्यर्थ” ठेवण्यात आलेले विशेष चषके प्रदान करण्यात येतील.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे: सबज्युनियर मुली विभाग:
28 किलोखालील
सुवर्ण- श्रेया पाल, प. बंगाल
रौप्य- सरंगना, केरळ
कांस्य- निधी, दिल्ली
कांस्य- पौर्णिमा सातपुते, महाराष्ट्र
32 किलोखालील
सुवर्ण-प्रियांका दास त्रिपुरा
रौप्य -भूमिका तंवर, हरियाणा
कांस्य -आफिया, केरळ
कांस्य- सेजल ठाकूर गुजरात
36 किलो खालील
सुवर्ण-हेतल, हरियाणा
रौप्य- ममता, छत्तीसगड
कांस्य- राजवी तळोकार, महाराष्ट्र
कांस्य- संजना, हिमाचल प्रदेश
40 किलोखालील
सुवर्ण- रोशनी, मणिपूर
रौप्य- सुषमा, हरियाणा
कांस्य – जीविका, दिल्ली
कांस्य- नंदिनी, पश्चिम बंगाल
44 किलोखालील
सुवर्ण -कोको माई, अरुणाचल प्रदेश
रौप्य-दिशा, हरियाणा
कांस्य -दृष्टी, राजस्थान
कांस्य -कनाबला, मणिपूर
सबज्युनियर मुले विभाग
30 किलोखालील
सुवर्ण-अधी, हरियाणा
रौप्य- बोथिस्वरन तामिळनाडू
कांस्य-सुजय, प. बंगाल
कांस्य -वेदांत पारधी, महाराष्ट्र
35 किलो खालील
सुवर्ण -जितेन अंकुश, हरियाणा
रौप्य- विवेक, मणिपूर
कांस्य- अमनदीप, पंजाब
कांस्य -मनमित सिंग, उत्तर प्रदेश
40 किलो खालील
सुवर्ण-शुभ शर्मा, उत्तर प्रदेश
रौप्य- नसीब बोरा, छत्तीसगड
कांस्य- अभिजीत, मणिपूर
कांस्य- इशू, पंजाब
45 किलो खालील
सुवर्ण- गर्व टोकस, दिल्ली
रौप्य- जयानंद, मणिपूर
कांस्य- लोकेंद्र गुजर, मध्य प्रदेश
कांस्य- वंगरंग वांगसु, अरुणाचल प्रदेश
50 किलो खालील
सुवर्ण- सुरजीत, मणिपूर
रौप्य- जतिन, पंजाब
कांस्य- दिवाकर रावत, उत्तराखंड
कांस्य -तागरु तालुक, अरुणाचल प्रदेश.