महाराष्ट्राच्या भूमीला जशी साधुसंताची परंपरा आहे. तशीच समाजसुधारकांची परंपरा आहे. हिंदूधर्मातील काही कालबाह्य रुढी , परंपरेत सुधारणा करण्याचे महत्त्वाचे काम या समाजसुधारकांनी केले. त्यांत महत्त्वाची भूमिका कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पार पाडली.
छञपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ मध्ये झाला.यांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे होते. कोल्हापूरच्या छञपती शिवाजी महाराजांच्या गादीसाठी त्यांना दत्तक निवडण्यात आले. इ.स.१८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानाचे राजकीय हक्क त्यांना मिळाले. त्यावेळी सर्वत्र ब्रिटिशांचे राज्य होते. शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूरच्या संस्थानात अनेक राजकीय व सामाजिक सुधारणा करण्याचा ध्यास घेतला. सर्वप्रथम आपल्या राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांला शिक्षणाचा अधिकार मिळावा. म्हणून प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.ज्या मुलांना खेड्यात उच्चशिक्षणाची सोय नव्हती. त्यांच्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी बोर्डींगची व्यवस्था केली. अनेक शाळा काढल्या. कोल्हापूर शहराच्या पाणी व्यवस्थेसाठी पंचगंगेवर “राधानगरी धरण” बांधले. त्याकाळात जातीव्यवस्थेच्या चौकटी फार भक्कम होत्या.
त्याकाळात अनेक सुधारणा घडवून आणल्या. शाहू महाराजांनी महात्मा फुलेंच्या “सत्यशोधक समाज” व स्वामी दयानंद सरस्वती यांच्या “आर्यसमाज” या संघटनेची शाखा कोल्हापूरात स्थापन केली. आंतरजातीय विवाहाला उत्तेजन देण्यासाठी आपल्या घराण्यातील एका मुलीचा विवाह इंदौरच्या होळकर घराण्यात लावून दिला. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य या ग्रंथाला , डॉ. आंबेडकरांचे पहिले वृत्तपत्र मुकनायकला आर्थिक मदत केली. बहुजन समाज , शेतकरी , सर्वसामान्य जनता , तसेच अनेक गुणवत्त कलाकारांना आधार दिला. सर्वसामान्य जनतेच्या दुःखाशी समरस होणारा असा हा ऋषीतुल्य राजा होता. असा हा लोकराजाचा मृत्यू ६ मे १९२२ मध्ये झाला. 6 मे शाहू महाराजांचा स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!…
▪️▪️▪️▪️▪️▪️
प्रशांत नारायण कुलकर्णी
इंदिरा नगर नाशिक















