“आई, मी फ्लाइटवर जातोय…” इरफानचा निरोप ठरला अखेरचा! : अहमदाबाद विमान अपघातात पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू

अहमदाबाद विमान अपघातात पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू
अहमदाबाद विमान अपघातात पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू

पुणे(प्रतिनिधि)– “आई, मी फ्लाइटवर जातोय… काळजी करू नकोस” तुझ्या तब्येतीची काळजी घे. मी पुन्हा फोन करतो… पिंपरीतील [Pimpri] इरफान शेखचा [Irfan Shaikh] आणि त्याच्या आईचा हा नेहमीचा संवाद. मात्र हा संवाद यावेळी अखेरचा ठरला.

पिंपरीच्या संत तुकाराम नगर [Sant Tukaram Nagar] परिसरातील रहिवासी इरफान शेख [Irfan Shaikh] (वय २२) गेल्या दोन वर्षांपासून विमान कंपनीत केबिन क्रू [Cabin Crew] म्हणून कार्यरत होता. कामाचा एक भाग म्हणून तो देशभर फ्लाइट्समध्ये प्रवास करायचा. कोणतीही फ्लाइट असो, तो आईला आधी कळवायचा कोणता मार्ग, कोणती वेळ, कुठे उतरणार… असा त्यांचा संवाद ठरलेला असायचा. यावेळी इरफानचा [Irfan Shaikh] नाही तर प्लेन क्रॅश [Plane Crash] झालेली बातमी आईला ऐकायला मिळाली आणि आईने एकच हंबरडा फोडला. शेजारी, मित्रपरिवार देखील या बातमीने सुन्न झाले आहेत.

अधिक वाचा  कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या : याने केली मोहोळची हत्या

अहमदाबाद [Ahmedabad] येथे घडलेल्या विमान अपघातात [Plane Accident] इरफानचाही [Irfan Shaikh] मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. ही बातमी समजताच त्याच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. “माझा इरफान [Irfan Shaikh] त्या फ्लाइटमध्ये होता!” असे त्या एकसारख्या बडबडत होत्या. इरफानच्‍या [Irfan Shaikh] मृत्‍यूची बातमी समजताच संत तुकारामनगरमध्ये [Sant Tukaram Nagar] शोककळा पसरली.


मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी भावाचे डीएनए सँपल [DNA Sample]

इरफानचे [Irfan Shaikh] आई-वडील आता अहमदाबादला [Ahmedabad] पोहोचले आहेत. अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने [DNA Samples] घेण्यात आले. इरफानच्या [Irfan Shaikh] भावाचा सॅम्पल [Sample] घेण्यात आला असून, तो जुळल्यावरच मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार असल्याची माहिती इरफानचे [Irfan Shaikh] काका फिरोज शेख [Firoz Shaikh] यांनी दिली.

अधिक वाचा  राहुल गांधी यांनी परभणीला भेट देऊन त्यांचं विद्वेषाचे काम पूर्ण केलेलं आहे- देवेंद्र फडणवीस यांची टीका

बकरी ईदसाठी आला होता पिंपरीत

इरफान [Irfan Shaikh] काही दिवसांपूर्वीच बकरी ईदसाठी [Bakri Eid] तीन दिवसांची सुट्टी काढून घरी आला होता. घरात हसणं, खेळणं, आईसोबतचे गप्पाटप्पा अजूनही घरच्यांच्या डोळ्यासमोर आहेत. पण त्यानंतर तो परत निघून गेला. आता तर तो आमच्यातून कायमचा निघून गेला आहे ही बातमी मनाला पटणार नाही. असे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. इरफानचे [Irfan Shaikh] मित्र, शेजारी, नातेवाईक अजूनही धक्क्यात आहेत. फोनवरच्या शेवटच्या बोलण्याच्या आठवणी, त्याचे फोटो, आणि “आई, मी परत येतो…” हे त्याचे शब्द आता काळजात खोलवर घर करून राहिले आहेत. असे त्याचे कुटुंबीय सांगत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love