पुणे शहरात झिकाचा वाढता संसर्ग : २६ गर्भवती महिलांसह ६६ जण बाधित ; चार जणांचा मृत्यू

पुणे शहरात झिकाचा वाढता संसर्ग : २६ गर्भवती महिलांसह ६६ जण बाधित
पुणे शहरात झिकाचा वाढता संसर्ग : २६ गर्भवती महिलांसह ६६ जण बाधित

पुणे(प्रतिनिधि)—पुणे शहरातील झिकाचा संसर्ग वाढत चालला आहे. पुणे शहरातील झिकाची रुग्णसंख्या ६६ वर पोहोचली आहे. दरम्यान, २६ गर्भवती महिलांना झिका व्हायरची लागण झालेली असून आतापर्यंत झिकाचा  संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

झिका व्हायरसचा सर्वात जास्त धोका हा गर्भवती महिला, लहान मुले आणि वृध्दांना आहे. झिकाची लागण झालेल्या आणि संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात खबरदारी घेतली जात आहे.

बावधन येथील १९ वर्षीय गर्भवतीमध्ये झिका विषाणूचा संसर्ग आढळून आला असून, शहरातील झिका विषाणूच्या संसर्गाची एकूण संख्या ६६ झाली आहे. चांदणी चौक, बावधन येथील १९ वर्षीय गर्भवतीची सोमवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) पुणे येथून मिळालेल्या अहवालानुसार झिका विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली. तिचे नमुने ३ ऑगस्ट रोजी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ती २२ आठवड्यांची गर्भवती होती.

अधिक वाचा  गणपती-गौरी सजावट व प्रसाद स्पर्धेचे मालपाणीज् बेकलाईटच्या वतीने आयोजन

शनिवार ते सोमवार दरम्यान, पुणे शहरात झिका विषाणूच्या  संसर्गाची आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.  ज्यात सहा गर्भवती महिला, कात्रज येथील एक ४० वर्षीय पुरुष आणि कोंढव्यातील १८ वर्षीय मुलाचा समावेश आहे. शनिवार ते सोमवार या कालावधीत झिका विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आढळलेल्या सहा गर्भवती महिलांमध्ये शनिवार ते रविवार या कालावधीत पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये धानोरी येथील ३३ वर्षीय महिला, खराडी येथील २३ वर्षीय महिला आणि २१ वर्षांच्या तीन महिलांचा समावेश आहे.  तसेच, पांडवनगर, शिवाजीनगर येथील एका २२ वर्षीय महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पीएमसीने सोमवारी पाषाण येथील दोन गर्भवती महिलांचे झिका विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या महिलांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले आहेत.

अधिक वाचा  कोरोमंडल इंटरनॅशनलने एस. शंकरसुब्रमण्यन यांना एमडी आणि सीईओ म्हणून दिली पदोन्नती

२०  जूनपासून पुणे जिल्ह्यात झिका विषाणूचे ७३ रुग्ण आढळले असून त्यात पुणे शहरातील ६६, पुणे ग्रामीणमधील पाच आणि पिंपरी-चिंचवडमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. तसेच, यापूर्वी पुणे शहरात झिका मुळे चार संशयित मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांच्या मृत्यूंचे परीक्षण करणार

सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांच्या मृत्यूंचे परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेला मुसळधार पाऊस, घाण आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका वाढल्याचं दिसून येत आहे.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love