पुणे- “काँग्रेसच्याच् योगदानातुन” ऊभारलेल्या, ‘स्वातंत्र्योत्तर भारतात’ वाढवलेल्या राष्ट्रीय संपत्तीच्या, वाढत्या विकासदराच्या आधारे, बेरोजगारीवर पकड व महागाईवर नियंत्रण ठेवल्याने व पायाभूत सुविधांसह शिक्षणाचा व प्रगतीचा विस्तार साधल्याने, प्रती ५ वर्षांनी देशातील जनतेने तब्बल १० वेळा ‘काँग्रेसने केलेल्या विकास कामांच्या आधारे’ निवडुन दिले, ही वास्तवता आहे. त्यामुळे जनतेने वारंवार निवडलेल्या ‘काँग्रेस-पक्षाची कार्यक्षमता व टिकाऊपणाच’ यातुन सिध्द होतो. त्यामुळे देशातील काँग्रेस’ची ऊपयुक्तताच्’ यातुन सिध्द होते. त्यामुळे ‘काँग्रेसला गंज चढला म्हणणे’ ही अकलेची दिवाळखोरी आहे, अशी टिका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
पंतप्रधान मोदींनी काँग्रेस’ला गंज चढल्याची टिका मप्र मध्ये एका कार्यक्रमात केली, त्या आरोपांवर उत्तर देतांना ते पुढे म्हणाले की, २०१४ – १९ मघील सत्ताकाळा नंतर सुध्दा, ज्यांना “नोटबंदी-जीएसटी, काळापैसा, १५ लाख, २कोटी रोजगार व कथित अच्छेदिन वर मते न मांगता”, अक्षम्य बेर्पाईमुळे झालेल्या ‘पुलवामा हल्यातील ४० जवानांच्या शहीदत्वावर मतांची भिक मागावी लागली’ त्या भारतीय जुमला पार्टीच्या नेतृत्वाने यावर बोलणे म्हणजे अकलेची दिवाळखोरी व अहंकारी वृत्तीचे प्रदर्शन असल्याची टीकाही तिवारी यांनी केली आहे.
लोकशाहीत, जनतेने निवडून देलेल्या क्र.२ च्या पर्यायी पक्षास, आपला शत्रू नव्हे तर, “जनतेचा दुसरा पर्याय व कौल” म्हणुन पाहणे गरजेचे आहे व त्यास स्वपक्षाच्या – कर्तुत्वाने व जनतेस सक्षम पर्याय देऊन लोकशाही_स्पर्धेत रहाणे गरजेचे असल्याचे देखील लोकशाही राष्ट्राच्या पंतप्रधान’पदी बसलेल्या व्यक्तीस कळु नये(?) याचे सखेद आश्चर्य वाटते. जेंव्हा स्वतःच्या बुध्दीवर व डोळ्यांवर गंज चढतो, तेंव्हा इतर धातुवरील गंज ओळखण्याची क्षमता संपते. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या ‘संविधानिक उत्तरदायीत्वावर’ गंज चढला व कोणता पक्ष ‘संविधानिक उपयुक्ततेत’ आहे.. हे ओळखण्याचे काम जनता २०२४ ला करेल गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.













