#मराठा आरक्षण: सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली


नवी दिल्ली – मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज पहिली सुनावणी सर्वोच्च नायालयात होती. मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करावं यासाठी ही सुनावणी महत्वाची होती. परंतु, सुरवातीला सरकारी वकिलांची अनुपस्थिती त्यानंतर सुनावणीला काही काळ तहकुबी मग पुन्हा सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी चार आठवड्यांनी पुढे ढकलत याचिकाकर्त्यांनी त्यांचे म्हणणे घटनापीठाकडे मांडण्याचे आदेश आज दिले.

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज पहिली सुनावणी झाली. ज्या तीन न्यायधीशांच्या खंडपीठाने स्थगिती दिली होती त्याच खंडपीठापुढे हे सुनावणी झाली. सुनावणी सुरु झाल्यानंतर  सुरुवातीला राज्य सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ते मुकूल रोहतगी हेच अनुपस्थित असल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी काही काळासाठी स्थगित केली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ते मुकूल रोहतगी यांनी हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याची किंवा सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने सुनावणी चार आठवडे पुढे ढकलत घटनापीठाकडे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  मराठा क्रांती मोर्चाचे राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन