पुणे:- महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु.ल. देशपांडे (P.L. Deshpande) यांचा २५ वा स्मृतीदिन आणि सुनिता देशपांडे (Sunita Deshpande) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु.ल. परिवाराच्या सहयोगाने (P.L. Parivar’s Collaboration) अव्याहतपणे चालू असलेला आणि करोना काळात बंद पडलेला ‘ग्लोबल पुलोत्सव‘ (Global Pulotsav) पुन्हा सुरू करण्यात येत असून दिनांक ९ ते १२ जून २०२५ या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rangmandir), कलादालन (Kaladalan) आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (National Film Archive of India – NFAI) येथे या महोत्सवाचा दिमाखदार सोहळा रंगणार आहे.
यानिमित्त यंदाचा पुलोत्सव जीवन गौरव पुरस्कार (Pulotsav Jeevan Gaurav Puraskar) ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली खान (Ustad Amjad Ali Khan) यांना, पु.ल. स्मृती सन्मान (P.L. Smruti Sanman) ज्येष्ठ चित्र-नाट्य रंगकर्मी सई परांजपे (Sai Paranjape) यांना, विशेष सन्मान स्व. प्रभा अत्रे (Prabha Atre) यांना, तर पु.ल. कृतज्ञता सन्मान (P.L. Krutagnyata Sanman) चिंतामणी हसबनीस (Chintamani Hasabnis) यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे निमंत्रक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education, Textiles and Parliamentary Affairs Cabinet Minister Chandrakant Patil), स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल (Kohinoor Group Chairman Krishnakumar Goyal), लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.चे सुशील जाधव (Susheel Jadhav, Lokmanya Multipurpose Co-op. Credit Society Ltd.), महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव (Virendra Chitrav) आणि सतीश जकातदार (Satish Jakatdar) यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या आभा औटी (Abha Auti, Lokmanya Cultural Foundation), बेलवलकर हाउसिंगचे समीर बेलवलकर (Sameer Belvalkar, Belvalkar Housing), कार्टुनिस्ट कंबाईनचे चारुहास पंडित (Charuhas Pandit, Cartoonist Combine) आदी उपस्थित होते. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्याच्या प्रवेशिका शनिवार दिनांक ७ जूनपासून सकाळी ९.०० ते ११.३० आणि संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळात बालगंधर्वच्या तिकीट खिडकीवर मिळणार आहेत. ‘कोहिनूर ग्रुप‘ (Kohinoor Group) प्रस्तुत व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (Lokmanya Multipurpose Co-op. Society Ltd.) आयोजित ग्लोबल पुलोत्सवाला स्किन सिटी (Skin City), बेलवलकर हाउसिंग (Belvalkar Housing), लोकमान्य कल्चरल फाऊंडेशन (Lokmanya Cultural Foundation), प्रथमेश कन्स्ट्रक्शन्स (Prathamesh Constructions) तसेच कार्टुनिस्ट कंबाईन (Cartoonist Combine), महाराष्ट्र साहित्य परिषद (Maharashtra Sahitya Parishad) व एन.एफ.डी.सी. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFDC National Film Archive of India) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या ‘ग्लोबल पुलोत्सवा’चे उद्घाटन सोमवार दिनांक ९ जून रोजी संध्याकाळी ६.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक (Madhu Manges Karnik) यांच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे स्व. प्रभा अत्रे यांच्या ‘स्वरमयी‘ (Swaramayi) संस्थेस विशेष पु.ल. पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यावेळी स्व. प्रभा अत्रे यांच्या ‘स्वरमयी’तर्फे सांगितिक सादरीकरण होणार आहे. पुलंची पुस्तके आणि दृक-श्राव्य साहित्याचा समावेश असलेल्या ‘पुस्तकवाला‘ (Pustakwala) यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन यानिमित्त होणार आहे. यानंतर रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ५० कलाकारांचा सहभाग असलेला ‘जावे पुलंच्या गावा‘ (Jave Pulanchya Gava) हा दृक-श्राव्य कार्यक्रम सादर होणार आहे.
मंगळवार दिनांक १० जून रोजी सकाळी १०.३० वाजता बालगंधर्व कलादालन येथे महाराष्ट्रातील १०० व्यंगचित्रकारांनी पु.ल. आणि त्यांच्या साहित्यास समर्पित केलेल्या व्यंगचित्रांच्या (Cartoons) आणि चिंतामणी हसबनीस यांच्या ब्रेल चित्रांच्या (Braille Paintings) खास प्रदर्शनाचे उद्घाटन नाबाद शंभरीतील ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस (Shi. Da. Phadnis) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब (Lokmanya Silver Window Club) प्रस्तुत सुधीर मोघे (Sudhir Moghe) दिग्दर्शित ‘या सम हा‘ (Ya Sam Ha) या पुलंवरील चित्रपटाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे.
यानंतर दुपारी २.०० वाजता एन.एफ.ए.आय. थिएटर (NFAI Theatre) येथे लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब प्रस्तुत पुलंना भावलेल्या चित्रपटांच्या विशेष महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर (Satish Alekar) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पुलंनी ‘ती फुलराणी’ (Ti Phularani) हे अजरामर नाटक ज्या चित्रपटाने प्रेरीत होवून लिहिले तो ‘पिग्मेलियन‘ (Pygmalion) हा चित्रपट दाखवला जाणार आहे.
यानंतर संध्याकाळी ६.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात जगविख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर (Vidyavachaspati Shankar Abhyankar) यांच्या हस्ते पुलोत्सव जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर संध्याकाळी ७.०० वाजता उस्ताद अमजद अली खान यांच्याशी चित्रपट दिग्दर्शक मकरंद ब्रम्हे (Makarand Brahme) प्रकट संवाद साधणार आहेत. रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘गोष्टी तिकडच्या‘ (Goshti Tikadachya) हा पुलंवरील विशेष दृक-श्राव्य कार्यक्रम वंदना बोकील कुलकर्णी (Vandana Bokil Kulkarni), मधुराणी प्रभूलकर (Madhurani Prabhulkar), गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni), गौरी देशपांडे (Gauri Deshpande) आणि पार्थ उमराणी (Parth Umrani) सादर करणार आहेत.
बुधवार दिनांक ११ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बालगंधर्व कलादालन येथे ‘पुलंचा विनोद: समकालीन का सर्वकालीन?’ (Pulancha Vinod: Samakalin Ka Sarvakalim?) या विषयावर परिसंवाद होणार असून त्यामध्ये रेखा इनामदार साने (Rekha Inamdar Sane), रामदास फुटाणे (Ramdas Phutane), चारुहास पंडीत, श्रीकांत बोजेवार (Shrikant Bojewar) सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी प्रा. मिलिंद जोशी (Prof. Milind Joshi) संवाद साधणार आहेत. दुपारी २.०० वाजता एन.एफ.ए.आय. लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब प्रस्तुत पुलंना भावलेल्या चित्रपटांच्या विशेष महोत्सवात पुलंनी ’एका कोळियाने‘ (Eka Koliyane) हे गाजलेले पुस्तक ज्या चित्रपटाने प्रेरीत होवून लिहिले तो चित्रपट : ‘द ओल्ड मॅन अँड द सी‘ (The Old Man and the Sea) दाखविण्यात येणार आहे.
संध्याकाळी ६.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात चिंतामणी हसबनीस यांना पद्मश्री गिरीश प्रभुणे (Padmashri Girish Prabhune) यांच्या हस्ते पुलोत्सव कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर संध्याकाळी ७.०० वाजता चिंतामणी हसबनीस यांचे सप्रयोग व्याख्यान होणार असून त्यांच्याशी डॉ. मंदार परांजपे (Dr. Mandar Paranjape) संवाद साधणार आहेत. रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ३५ कलाकारांनी सादर केलेला ‘मॅड सखाराम + मराठीचा गाळीव इतिहास‘ (Mad Sakharam + Marathi cha Galiv Itihas) हा नाट्याविष्कार सादर होणार आहे.
गुरूवार दिनांक १२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बालगंधर्व कलादालन येथे ‘सर्जनशील सहजीवन : पु. ल. आणि सुनिताबाई’ (Sarjanshil Sahjeevan: P.L. Ani Sunita Bai) या विषयावर परिसंवाद होणार असून त्यामध्ये दिनेश ठाकूर (Dinesh Thakur), डॉ. मंदार परांजपे, सतीश पाकणीकर (Satish Paknikar) सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी मंगला गोडबोले (Mangala Godbole) संवाद साधणार आहेत. दुपारी २.०० वाजता एन.एफ.ए.आय. येथे लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब प्रस्तुत पुलंना भावलेल्या चित्रपटांच्या विशेष महोत्सवात पुलंनी प्रभावित होवून जे ‘सुंदर मी होणार‘ (Sundar Mi Honar) हे नाटक लिहिले तो ‘द बॅरेट ऑफ विंपॉल स्ट्रीट‘ (The Barretts of Wimpole Street) हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
संध्याकाळी ६ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि कलाकार सई परांजपे यांना एन.एफ.डी.सी.चे संचालक प्रकाश मगदूम (NFDC Director Prakash Magdum) यांच्या हस्ते पु. ल. स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर संध्याकाळी ७.०० वाजता सई परांजपे यांची प्रकट मुलाखत होणार आहे.
या महोत्सवाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले (Snehal Damle) आणि राजेश दामले (Rajesh Damle) करणार असून या महोत्सवाचा आनंद पुणेकरांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.