पोलीस, डॉक्टर या समाज रक्षकांशी ‘मैत्री’ – जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या विविध शाखांचा अनोखा उपक्रम

पोलीस, डॉक्टर या समाज रक्षकांशी 'मैत्री' - जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या विविध शाखांचा अनोखा उपक्रम
पोलीस, डॉक्टर या समाज रक्षकांशी 'मैत्री' - जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या विविध शाखांचा अनोखा उपक्रम

पुणे – आपल्या शाळा महाविद्यालयातील मित्र मैत्रिणी सोबत आपण विविध दिन नेहमीच साजरे करतो. मैत्री दिनानिमित्त देखील मित्र-मैत्रिणींसोबत विविध कार्यक्रमात सहभागी होतो. मात्र नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस मधील विद्यार्थ्यांनी समाजातील खरेखुरे रक्षक असलेल्या पोलीस आणि डॉक्टरांसोबत मैत्री दिन साजरा केला.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या पॅराडाईज ज्युनिअर कॉलेज,  इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,  पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, जाधवर इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपक्रमात सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष एडवोकेट शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

नऱ्हे परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये, वृद्धाश्रम, पोलीस चौकीमध्ये जावून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. तसेच डॉक्टर आणि पोलीस हे समाजासाठी करत असलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच वडगाव पुलाखाली फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी वाहतूक जनजागृती केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  समाजात बंधुता रुजवण्यासाठी एकदिलाने काम करुया ! - प्रदीप रावत : डॉ.आंबेडकरांनी भेट दिलेल्या संघस्थानावर बंधुता परिषदेचे आयोजन