पुणे (प्रतिनिधी) – भारतीय सशस्त्र दलांमधील (Indian Armed Forces) महिलांसाठी (Women) एक ऐतिहासिक क्षण (Historic Moment) नोंदवला गेला, कारण राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), पुणे (Pune) येथून महिला कॅडेट्सची (Women Cadets) पहिली तुकडी (First Batch) गुरुवारी, २९ मे २०२५ रोजी पदवीधर (Graduated) झाली. १४८ व्या एनडीए अभ्यासक्रमाच्या (148th NDA Course) दीक्षांत समारंभात (Convocation Ceremony) एकूण ३३९ कॅडेट्सना पदवी प्रदान (Degrees Conferred) करण्यात आली, ज्यात १७ महिला कॅडेट्सचा समावेश (Included) आहे. दरम्यान, आज (शुक्रवार) या १४८ व्या तुकडीची पासिंग आउट परेड (POP) होणार आहे. या ऐतिहासिक परेडचे (Historic Parade) समीक्षण अधिकारी (Reviewing Officer) भारतीय सैन्याचे माजी प्रमुख (Former Army Chief) आणि सध्या मिझोरमचे राज्यपाल (Governor of Mizoram) असलेले जनरल विजय कुमार सिंह (निवृत्त) (Gen. Vijay Kumar Singh (Retd.)) असतील. अवॉर्ड विजेती कॅडेट श्रिती दक्ष (Cadet Shriti Daksh) ही पहिली गर्ल्स कॅडेट (First Girl Cadet) बनली असून, एनडीएच्या इतिहासात (History of NDA) तिने आपले नाव सुवर्ण अक्षरांनी (Golden Letters) कोरले आहे. (Historic moment: First batch of women cadets graduate from National Defence Academy)
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मधून उत्तीर्ण झालेल्या १७ महिला कॅडेट्सना गुरुवारी झालेल्या पदवीप्रदान समारंभात दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (Jawaharlal Nehru University, Delhi) पदवी देण्यात आली. एनडीएच्या १४८व्या बॅचचा पदवीप्रदान समारंभ गुरुवार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजता मेजर जनरल हबीबुल्ला सभागृहात (Major General Habibullah Auditorium) पार पडला. समारंभाला गोरखपूरच्या दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाच्या (Deendayal Upadhyay University, Gorakhpur) कुलगुरू (Vice Chancellor) प्रा. डॉ. पूनम टंडन (Prof. Dr. Poonam Tandon) मुख्य पाहुण्या (Chief Guest) म्हणून उपस्थित होत्या. एनडीएचे कमांडंट (Commandant) व्हाइस अॅडमिरल गुरचरणसिंह (Vice Admiral Gurcharan Singh), डेप्युटी कमांडंट (Deputy Commandant) सरताज बेदी (Sartaj Bedi), प्राचार्य (Principal) ओमप्रकाश शुक्ला (Omprakash Shukla) आणि विविध फॅकल्टी प्रमुखही (Faculty Heads) व्यासपीठावर उपस्थित होते.
बीएस्सी (B.Sc.) मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कॅडेट लकीकुमार (Lucky Kumar) याला सिल्व्हर मेडल (Silver Medal) आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्रॉफी (Chief of Army Staff Trophy) देण्यात आली. बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स) (B.Sc. (Computer Science)) मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कॅडेट प्रिन्सकुमारसिंह कुशवाह (Prince Kumar Singh Kushwaha) याला सिल्व्हर मेडल आणि चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ट्रॉफीने (Chief of Naval Staff Trophy) सन्मानित करण्यात आले.
बी.ए. (B.A.) मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी महिला कॅडेट श्रिती दक्ष (Shriti Daksh) हिला सिल्व्हर मेडल आणि चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रॉफी (Chief of Air Staff Trophy) देण्यात आली. बी.टेक (B.Tech) मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कॅडेट उदयवीर सिंह नेगी (Udayveer Singh Negi) याला सिल्व्हर मेडल आणि सीआयएससी ट्रॉफीने (CISC Trophy) गौरवण्यात आले.
पदवी प्राप्त करणाऱ्यांमध्ये विज्ञान शाखेतील (Science Stream) ८४, कॉम्प्युटर सायन्स शाखेतील (Computer Science Stream) ८५ आणि कला शाखेतील (Arts Stream) ५९ कॅडेट्स आहेत. यासोबतच, नेव्ही (Navy) आणि एअर फोर्समधील (Air Force) बी.टेक शाखेच्या १११ कॅडेट्सना तीन वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र (Certificate) मिळाले आहे. या नेव्ही आणि एअर फोर्स कॅडेट्सना त्यांच्या संबंधित अकादमींमधील (इंडियन नेव्हल अकादमी (Indian Naval Academy) आणि एअर फोर्स अकादमी (Air Force Academy)) एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर (Training) पदवी दिली जाईल.
शैक्षणिक कामगिरीमध्ये (Academic Performance), पहिल्या महिला तुकडीतील डिव्हिजन कॅडेट कॅप्टन श्रीती दक्ष (Shriti Daksh) हीने कला शाखेत प्रथम येण्याचा मान मिळवला, त्या या तुकडीतून शैक्षणिक टॉपर (Academic Topper) ठरल्या. विज्ञान शाखेत कॅडेट लकी कुमार (Lucky Kumar), कॉम्प्युटर सायन्स शाखेत बटालियन कॅडेट कॅप्टन प्रिन्स कुमार सिंग कुशवाह (Prince Kumar Singh Kushwaha) आणि बीटेक शाखेत अकॅडमी कॅडेट कॅप्टन उदयवीर सिंग नेगी (Udayveer Singh Negi) यांनी आपापल्या शाखांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या तुकडीमध्ये १७ मित्र देशांचे (Friendly Countries) कॅडेट्स देखील होते.
प्रा. डॉ. पूनम टंडन (Prof. Dr. Poonam Tandon) यांनी सर्व पदवीधर कॅडेट्सचे अभिनंदन (Congratulated) केले आणि हा टप्पा भविष्यातील गौरवशाली कारकिर्दीचा (Glorious Career) पाया ठरेल अशी आशा व्यक्त केली. महिला कॅडेट्सच्या पदवीधर होण्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, आजची महिला कॅडेट्सची ही कामगिरी केवळ त्यांची स्वतःची नाही, तर देशभरातील हजारो तरुण महिलांसाठी हा एक मोठा बदल (Breakthrough) आहे. त्यांनी महिला कॅडेट्सना बदल (Change), धैर्य (Courage) आणि क्षमतेचे (Capability) मशालवाहक (Torchbearers) असे संबोधले.
महिलांना एनडीएत प्रवेशाची परवानगी (Permission to Join NDA) २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानंतर (Directions) मिळाली होती, ज्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) महिलांना अर्ज करण्यास संमती दिली. महिला कॅडेट्सची पहिली तुकडी जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये १४८ व्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून एनडीएमध्ये दाखल झाली.
‘आम्ही चालवू हा पुढे वारसा..’ (‘We Will Carry This Legacy Forward..’)
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) १४८ व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा (Convocation Ceremony) गुरुवारी दिमाखात पार पडला. यामध्ये ३३९ छात्रांनी विविध विषयांत पदवी घेतली. यात चमकदार कामगिरी (Stellar Performance) केलेल्या छात्रांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी (Families) माध्यमांशी (Media) संवाद साधून अनुभव (Experiences) व्यक्त केले. विशेष म्हणजे ‘एनडीए’तील लष्करी प्रशिक्षणासोबतच (Military Training) चार छात्रांनी अभ्यासातही चमकदार कामगिरी करून रौप्यपदक (Silver Medal) पटकाविले. श्रृती दक्ष (Shriti Daksh) हिने कला शाखेत, उदयवीरसिंह नेगी (Udayveer Singh Negi) याने बीकेट, प्रिन्सकुमारसिंह कुशवाह (Prince Kumar Singh Kushwaha) याने बीएससी कॉम्प्युटर सायन्स, तर लकीकुमार (Lucky Kumar) याने ‘बीएससी’मध्ये रौप्यपदक मिळविले. या चारही छात्रांना कुटुंबातून लष्करी वारसा (Military Legacy) मिळालेला आहे. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा..’ हे प्रत्यक्षात उतरवून दाखविले.
माझे यश सशस्त्र सैन्य दलात येऊ पाहणाऱ्या मुलींना निश्चित प्रेरणा देईल – श्रृती दक्ष (My Success Will Definitely Inspire Girls Aspiring to Join Armed Forces – Shriti Daksh)
‘आम्ही मूळचे हरियाणाचे (Haryana) असून आता नोएडा (Noida) येथे वास्तव्याला आहे. माझे शालेय शिक्षण (Schooling) हे नोएडा येथील शाळेतच झाले. दहावीत ९७ टक्के, तर बारावीत ९९ टक्के मिळाले होते. एनडीए’मधील प्रशिक्षण अतिशय खडतर (Rigorous) होते. इथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास (Adjusting) थोडा वेळ गेला, मात्र त्यानंतर येथील शिक्षक (Teachers), वरिष्ठ छात्रांमुळे (Senior Cadets) सर्वच एकरूप झालो. माझे वडील योगेशकुमार दक्ष (Yogesh Kumar Daksh) सेवानिवृत्त विंग कमांडर (Retired Wing Commander) आहेत. ते ‘एनडीए’च्या ८६ व्या तुकडीचे स्नातक (Alumnus) आहेत. माझी आई शिक्षिका (Teacher) आहे, तर मोठी बहीण ही हवाई दलात (Air Force) फ्लाईंग ऑफिसर (Flying Officer) म्हणून कार्यरत आहे. मी आता इंडियन मिलिट्री अकादमी (IMA) येथे पुढील प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे. माझे हे यश माझ्यासारख्या सशस्त्र सैन्य दलात येऊ पाहणाऱ्या मुलींना निश्चित प्रेरणा देईल, असा विश्वास आहे’, अशा भावना श्रृती दक्ष (Shriti Daksh) हिने व्यक्त केल्या.
‘एनडीए’तील ऐतिहासिक बदलाचे आम्ही साक्षीदार- प्रिन्सकुमार सिंह कुशवाह (‘We Witnessed the Historic Change at NDA’ – Prince Kumar Singh Kushwaha)
उत्तरप्रदेशातील मथुरा (Mathura, Uttar Pradesh) येथील असून माझे वडील लक्ष्मीलाल कुशवाह (Laxmilal Kushwah) हे लष्कराच्या तोफखाना विभागातून (Artillery Regiment) सेवानिवृत्त झाले आहेत, तर आई गृहिणी (Homemaker) आहे. एक बहीण आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) येथे वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेत आहे आणि दुसरी बहीण चैन्नई (Chennai) येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये (OTA) छात्र म्हणून प्रशिक्षण घेत आहे. ती देखील लवकरच सैन्यदलात दाखल होईल. ‘एनडीए’मधील तीन वर्षे ही खूप संस्मरणीय (Memorable), आव्हानात्मक (Challenging) होती. मात्र, या तीन वर्षांत आयुष्याच्या पुढील टप्प्यात उपयोगी पडतील, अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माझे वडील लष्करी सेवेत असल्याने लहानपणापासूनच या क्षेत्राबद्दल आदर (Respect), आपुलकी (Affection) होती. मात्र, अकरावीत आल्यानंतर ‘एनडीए’मध्ये येण्याचे ठरविले. कारण सशस्त्र सैन्यदलात येण्यासाठी ‘एनडीए’ हाच राजमार्ग (Highway) आहे. दहावीत ९७ टक्के, बारावीत ९६ टक्के होते. पुरुषांचे वर्चस्व (Male Dominated) असलेली ही अकादमीत मुलींच्या प्रवेशाने (Entry of Girls) ती सर्वसमावेशक (Inclusive) झाली, असे वाटते. हा ऐतिहासिक बदल (Historic Change) प्रथमत: आमच्या तुकडीने अनुभवला, हे माझ्यासाठी विशेष आहे’, अशा भावना प्रिन्सकुमार सिंह कुशवाह (Prince Kumar Singh Kushwaha) याने व्यक्त केल्या.
खडतर प्रशिक्षणाने अंतर्बाह्य बदललो- लकीकुमार (Rigorous Training Transformed Me Inside Out – Lucky Kumar)
मी बिहार (Bihar) राज्याचा असून माझे वडील शेतकरी (Farmer), तर आई गृहिणी (Homemaker) आहे. चुलतभाऊ (Cousin) ‘एनडीए’तून उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याच्याकडून ‘एनडीए’मध्ये येण्याची प्रेरणा (Inspiration) मिळाली. हवाईदलात (Air Force) जाण्याचा मानस आहे. ‘एनडीए’तील प्रशिक्षणाने संपूर्ण बदलून गेलो, असे वाटते. तीन वर्षांच्या प्रशिक्षणात अनेक खेळ (Sports) देखील शिकलो. त्यामध्ये हॉकीचा (Hockey) समावेश आहे. त्यापूर्वी मी कधीही हॉकी खेळलो देखील नव्हतो. मात्र, आमच्या टीमचा मी हॉकीचा कर्णधार (Captain) होतो आणि आमच्या टीमने चषक (Trophy) देखील पटकाविला’, अशा भावना लकीकुमार (Lucky Kumar) याने व्यक्त केल्या.
कौटुंबीक वारश्याची प्रेरणेनेच ‘एनडीए’मध्ये आणले- उदयवीरसिंह नेगी (Family Legacy Inspired Me to Join NDA – Udayveer Singh Negi)
मी लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून (Military Background Family) येतो. माझ्यानिमित्ताने कुटुंबातील चौथी पिढी (Fourth Generation) लष्करी सेवेत आज दाखल होत आहे. नौदलात (Navy) जाण्याचा माझा मानस आहे. माझे आजोबा (Grandfather) आणि वडील (Father) दोघेही कमांडिंग ऑफिसर (Commanding Officer) होते. त्यामुळे सैन्यदलाच्या कौटुंबिक वारश्याची प्रेरणा (Inspiration from Military Family Legacy) मला ‘एनडीए’मधील तीन वर्षांत कामी आली. लहानपणापासूनच सैन्यदलाबद्दल ओढ (Attraction to Military) होती, तीच मला ‘एनडीए’मध्ये खेचून घेऊन आली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माझे वडील माझे प्रेरणास्थान (Inspiration) आहेत’, अशा भावना उदयवीरसिंह नेगी (Udayveer Singh Negi) याने व्यक्त केल्या.
कुटुंबाचा वारसा पुढे नेल्याचा सार्थ अभिमान…. (Proud to Carry Forward Family’s Legacy….)
‘मोठी मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत असून दुसरी मुलगी ओटीए चैन्नई (OTA Chennai) येथे प्रशिक्षण घेत आहे, तर मुलगा सैन्यदलात दाखल झाला आहे. त्यामुळे माझ्यासाठी नव्हेतर आमच्या सर्व कुटुंबासाठी आनंद (Joy) आणि अभिमानाचा (Pride) क्षण आहे, अशा भावना प्रिन्सकुमारचे वडील लक्ष्मीलाल कुशवाह (Laxmilal Kushwah) यांनी व्यक्त केल्या.
‘३० वर्षांपूर्वी मी देखील ‘एनडीए’मधून उत्तीर्ण होऊन सैन्यदलात दाखल झालो होतो. माझ्या पावलावर पाऊल ठेऊन (Following in My Footsteps) माझ्या छोट्या मुलीने देखील सशस्त्र सैन्यदलात प्रवेश केला. तसेच माझ्यापेक्षा जास्त चांगल्या गुणांनी (Better Marks) आणि शैक्षणिक विषयात (Academic Subject) अव्वल स्थान (Top Position) मिळविले आहे, ही अतिशय अभिमानाची बाब आहे’, अशा भावना श्रुतीचे वडील विंग कमांडर (नि.) योगेशकुमार दक्ष (Wing Commander (Retd.) Yogesh Kumar Daksh) यांनी व्यक्त केल्या.
‘आपला मुलगा रौप्यपदकासह (Silver Medal) ‘एनडीए’सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून (Prestigious Institution) उत्तीर्ण होऊन बाहेर पडत असल्याचा सार्थ अभिमान आहे. माझा मुलगा आमच्या कुटुंबातील चौथी पिढी (Fourth Generation) म्हणून सैन्यदलात दाखल होत आहे. मात्र, तो लष्करात नव्हे, तर नौदलात (Navy) का रुजू होत आहे?, असा प्रश्न मला परिचयातील सर्वजण विचारत आहेत. कुटुंबाच्या लष्करी वारश्यात (Military Legacy) नौदलात कोणीही नव्हते, त्यामुळे तो नौदलात रुजू होत आहे, असे गमतीने (Jokingly) मी सांगत आहे. मात्र, त्याला तांत्रिक विषयांची आवड (Interest in Technical Subjects) आणि समुद्राची ओढ (Love for Sea) असल्याने त्यानेच नौदलात जाण्याचा निर्णय घेतला’, अशा भावना कर्नल आदित्यसिंह नेगी (Colonel Adityasinh Negi) यांनी व्यक्त केल्या.