फायर बॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलने सुवर्णपदकावर नाव कोरले

फायर बॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलने सुवर्णपदकावर नाव कोरले
फायर बॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलने सुवर्णपदकावर नाव कोरले

पुणे-  रोमांचकारी व अटीतटीच्या खेळामध्ये चपळतेचा वापर करून ध्रुव ग्लोबल स्कूलच्या ११ वर्षाखालील मुलींच्या संघाने फायरबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ११-१० या स्कोअरच्या जोरावर विरूध्द टीमला १ पॉइंटने हरवून सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यांच्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशोवर्धन मालपाणी व प्राचार्या संगीता राऊत यांनी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र मंडळ बास्केटबॉल क्लबतर्फे गुलटेकडी येथे आयोजित फायर बॉल स्पर्धेत २० पेक्षा अधिक संघांनी सहभाग नोंदिविला होता. यामध्ये फायनल राउंडमध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल च्या खेळाडूंनी रोमांचकारी आणि बुद्धीमत्तेचा वापर करून सुवर्णपदक ध्रुव ग्लोबल स्कूलच्या नावे केले. या टीम मध्ये सायली जैन, जुई गोडबोले, ईशा नरगुंडे आणि अनया जैन यांचा समावेश होता. त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी बास्केटबॉल प्रशिक्षक मिस पूनम बुट्टे व संकेत कुंभार यांनी मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा १५ फेब्रुवारी पासून 

तसेच प्राचार्या संगीता राऊत म्हणाल्या, या विजयामुळे शाळेसाठी अभिमानास्पद घटना आहे. यामुळे आमच्या विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love