पुणे: ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. सागर ढोले पाटील सर यांचे मार्गदर्शन व प्रेरणेतून ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स चा निकाल 99 % लागला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा.श्री. सागर ढोले पाटील सर यांनी अभिनंदन केले.
ढोले पाटील एज्युकेशन संस्थेतील विविध विभागातील सर्व प्राचार्य व विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
ढोले पाटील जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स मधून
१. साई तन्मई वड्डमणी ( ९३.५०%)
2. विजया राणी (९१.००%)
3. सोनाक्षी बार्कलेज (८७.६७%) या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले.
महाविद्यालयातील आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स मधून ५०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.मोठ्या संख्येने परीक्षेत बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे सर्व स्तरातून विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव झाला.
ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांनी संस्थेचे चेअरमन, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी मधील सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्या बद्दल आभार मानले.