पुणे- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘संस्कार भारती’ यांच्या ‘स्नेह’ या नाट्यसंस्थेने ‘देवी’ या एकलनाट्याची निर्मिती केली असून शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार, दि. ९ मे रोजी सायं. ६ वाजता कोथरूडच्या मयूर कॉलनीतील एमईएस सभागृहात या आयोजित केला आहे.
या नाट्यरूपाचे लेखन व दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांनी केले असून रश्मी देव प्रयोगाची प्रस्तुती करणार आहेत.
अहिल्यादेवींची एक आदर्श राज्यशासक म्हणून इतिहासात नोंद आहे. त्यांचे कुशल नेतृत्व, धडाडीचे कर्तृत्व, अचूक न्यायदान, राजनीती आणि रणनीतीची चाणक्षता, प्रजावत्सलता असे सारे गुण जपत जीवनभर कर्तव्यकठोर आचारण करणाऱ्या या कर्मयोगिनीला कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्यासाठी ‘संस्कार भारती’, पश्चिम प्रांत यांनी महाराष्ट्र ‘एज्युकेशन सोसायटी सिनियर कॉलेज, पुणे’ यांच्या सहकार्याने ही नाट्यनिर्मिती केली आहे.
पुणे महानगराच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित नाट्याचा अनुभव घेण्यासाठी रसिकांनी आवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे. मोफत प्रवेशिकांसाठी नमूद क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मैत्रेयी बापट-९८२२५ २६३४३ कुशल-७०६६९ ४८७११. प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण: मएसो सीनियर कॉलेज, १३१, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे. वेळ सकाळी १० ते ३