नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालक व विश्वस्तांवरही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी


पुणे-कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालक व विश्वस्तांवरही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई  करण्याची मागणी शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली.

यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबी तपासून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी पालकांना दिले. कोणत्याही दबावाला बळी पडता पोलिस कारवाई करतील,असेही अमितेश कुमार यांनी पालकांना आश्वस्थ केले.

नृत्य शिक्षकाने अत्याचार केल्या प्रकरणी चार गुन्हे दाखल झाले आहेत. आणखी काही लहान मुलांवर अत्याचार झाल्याचे समुपदेशादरम्यान निदर्शनास आले आहे. त्याबाबतही तपास करावा, अशी मागणी पालकांच्या शिष्टमंडळाने केली.

शाळेत गेली दोन वर्षे हा प्रकार घडत आहे. मुलांनी ही बाब शिक्षकांना सांगितल्यावर हा प्रकार उघड झाला आहे. शाळा प्रशासनाकडून याबाबतीत अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यासाठी संस्थाचालक अन्वित पाठक व ट्रस्टी तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली.

अधिक वाचा  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ 100 ग्रॅम वजन वाढल्याने कुस्तीपटू विनेश फोगाट स्पर्धेतून बाहेर : असे ठेवतात खेळाडू आपलं वजन नियंत्रणात

शाळेकडून सीसीटीव्ही सर्वेलन्स केले जात नाही. सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत. मुलांचे ‘गूड टच, बॅड टच’चे समुपदेशन होत नाही. पालक व शिक्षकांच्या बैठका वेळेवर होत नाहीत. शिक्षकांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासले जात नाही. संस्थेचे प्रशासन याबाबत गांभिर्याने पाहत नाही. त्यामुळे या घटना घडत असल्याचे पालकांनी पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणले.

याबाबत शिक्षण आयुक्त व पोलिस अधिकाऱ्यांशी बोलून त्यावर ठोस कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात पोलिस प्रशासन कोठेही कमी पडणार नाही आणि तपासात दोषी आढळलेल्या संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी कीसांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love