स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: राहुल गांधी यांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी

राहुल गांधी यांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी
राहुल गांधी यांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी

पुणे(प्रतिनिधि)— स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर पुणे न्यायालयात बदनामी खटला दाखल झाला आहे. दरम्यान, दोन वेळा समन्स बजावल्यानंतरही राहुल गांधी पुणे न्यायालयात हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी वकील संग्राम कोल्हटकर यांनी पुणे कोर्टात केली आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पुणे न्यायालयात बदनामी खटला दाखल झाला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीस हजर राहण्याचे समन्स राहुल गांधी यांना बजावण्यात आला होते. मात्र ते हजर राहिले नाही. आता पुढील सुनावणी ही १० जानेवारी होणार आहे.

अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले की, पुढील तारखेला राहुल गांधी हजर राहतील असे सागितले आहे. परंतु त्यालाही आम्ही आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांना दोन वेळा समन्स बजावले होते. आता परत न्यायालयात उपस्थितीत राहिले नाही तर न्यायालय कठोर कारवाई करेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

अधिक वाचा  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांना मिळाले 5 कोटी रुपये: पूजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप

राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. सध्या संसदेचे सत्र सुरू आहे. त्यामुळे त्यांना या ठिकाणी हजर राहता येत नाही, असा युक्तीवाद राहुल गांधी यांच्या वकिलांनी कोर्टात केला.

सत्यकी सावरकर यांनी म्हटले की, राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यांना आज उपस्थितीत राहावे म्हणून सांगितले होते. ते आले नाही. ते सगळीकडे फिरत आहेत. सभा घेत आहेत. परंतु न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही. आता पुढच्या सुनावणीला राहुल गांधी आले नाहीत तर अटक वॉरंट निघू शकते.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

लंडनमधील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप केला होता. राहुल गांधी यांच्या मते सावरकरांनी एका पुस्तकात म्हटले होते की सावरकरांच्या पाच – सहा मित्रांनी एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि सावरकरांना त्यावेळी आनंद झाला होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love