नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार  प्रकरणी संस्थाचालकाला अटक

नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार  प्रकरणी संस्थाचालकाला अटक
नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार  प्रकरणी संस्थाचालकाला अटक

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कर्वेनगर भागातील एका नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार  प्रकरणी पोलिसांनी संस्थाचालकाला अटक केली आहे.अन्वित सुधीर फाटक असे या संस्थाचालकाचे नाव आहे.

मंगेश साळवे असं अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाचं नाव आहे. याबाबत पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करत शिक्षकाला पोलिसांनी तत्काळ अटक केली. न्यायालयाने त्याला २२ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपी नृत्य शिक्षक पहिली ते पाचवी इयत्ता मधील मुला-मुलींना नृत्याचे शिक्षण देतो. सहावी इयत्तेपासून पुढील विद्यार्थ्यांना आठवड्यातून चार दिवस अतिरिक्त क्लास घेऊन शाळेच्या आवारात नृत्य शिकवतो.  या शाळेत समुपदेशक विद्यार्थी- विद्यार्थिनींना ‘गुड टच बॅड टच’ ची बाबत माहिती देत असतात त्यातून ११ वर्षीय पीडित मुलाने १७  डिसेंबर रोजी आरोपी शिक्षकाने आपल्याला वाईट स्पर्श केल्याचे समुदेशकांना सांगितले. नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर लैंगिक व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले. मुलांवर अत्याचार करतानाचे त्याचे मोबाईलमध्ये रेकॉडिंग करुन ती इतर लोकांना पाठविण्याची धमकी दिली. तसेच मुलाला शपथ देऊन मारण्याची धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबर पासून १४ डिसेंबर पर्यंत सुरु असल्याचे समोर आले आहे.

अधिक वाचा  भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल: का झाला गुन्हा दाखल?

पीडित मुलाच्या आई वडिलांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी शिक्षक मंगेश साळवे याला अटक केली. यापूर्वी सुद्धा त्यानं इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. शिक्षकानं मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळताच पालकांकडून शाळेच्या बाहेर आंदोलन देखील करण्यात आले. आरोपी शिक्षकावर आणखी तीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकानं आणखीही विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम  यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नृत्यशिक्षकाला कालच अटक केली होती. या घटनेत निष्काळजीपणा दाखविल्याने संस्थाचालक अन्वित फाटक याला अटक केली आहे.

अधिक वाचा  पवारांचं सरकार येईल तेव्हा मराठा आरक्षण गायब होईल- अमित शहा

दरम्यान, या शाळेमध्ये समुपदेशादरमयान आणखी काही लहान मुलांवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतही तपास करावा, अशी मागणी पालकांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार  यांना भेट देऊन केली. या प्रकारात शाळा प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संस्थाचालक अन्वित पाठक व ट्रस्टी तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

शाळेत मुलांचे गुड टच, बॅड टच चे समुपदेशन होत नाही़ पालक व शिक्षकांच्या बैठका वेळेवर होत नाही. शिक्षकांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासले जात नाही. संस्थेचे प्रशासन याबाबत गांभिर्याने पहात नाही. त्यामुळे या घटना घडत असल्याचे पालकांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणले.

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love