हरियाणात भाजपची हॅट्रिक : कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून विजयाचा मोठा जल्लोष

कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून हरियानाच्या विजयाचा जल्लोष
कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून हरियानाच्या विजयाचा जल्लोष

पुणे : हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा सलग विजय मिळवत ऐतिहासिक हॅट्रिक साधली आहे. सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून भाजपने केलेल्या विकासाच्या योजनांमुळे जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवत भाजपला विजय मिळवून दिला होता, आणि आता हरियाणा विधानसभा निवडणुकीतही जनतेचा तोच विश्वास अधोरेखित झाला आहे.

या विजयाचा उत्सव पुण्यातील कसबा मतदारसंघात मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. कसबा विधानसभा निवडणूक प्रमूख श्री हेमंत रासने यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजयाचा जल्लोष केला. या जल्लोषात स्थानिक नागरिकांचा देखील मोठा सहभाग होता.

अधिक वाचा  दुसऱ्यांच्या टीकेला मी काहीच किंमत देत नाही-का म्हणाले अजित पवार असे?

विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी नागरिकांना जिलेबी वाटली, आणि हेमंत रासने यांनी स्वतः उपस्थित नागरिकांना जिलेबी भरवून त्यांचे अभिनंदन केले. विजयाच्या या सोहळ्यात मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयानंतर बोलताना हेमंत रासने म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या विकासाच्या धोरणांमुळे जनतेचा विश्वास कायम राहिला आहे. हरियाणात मिळालेल्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत देखील भाजपच्या महायुतीला असाच मोठा विजय मिळेल, याची मला खात्री आहे.”

या जल्लोषात कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, मा. नगरसेवक राजेश येनपुरे, सरचिटणीस राणीताई कांबळे, वैशालीताई नाईक, उमेश चव्हाण, चंद्रकांत पोटे, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, छगन बुलाखे, निलेश कदम, तेजेंद्र कोंढरे, संदीप लडकत, प्रमोद कोंढरे, संदीप इंगळे, अश्विनीताई पवार, भारत जाधव, सनी पवार, अभिजित रजपूत, दिपाली मारटकर, कल्याणी नाईक, रुपाली कदम, सागर शिंदे, गणेश पाचरकर, माधव साळुंखे, संकेत थोपटे, सतीश मोहोळ, आरती तांबे, तुषार रायकर, दिलीप पवार, सागर खरात , सुरेंद्र ठाकूर, मनीष साळुंखे, मनीष जाधव, साहिल राजपूत, किरण शिंदे, अमित गोखले, राजवीर आव्हाड, विजय मरळ, ऋषिकेश मळेकर, अतुल केंदूरकर यांसह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love