पुणे- आयुष्यात यशस्वी होण्यासाठी EQ आणि IQ दोन्ही महत्वाचे आहे. त्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स Emotional Intelligenceहा सुद्धा खूप महत्वाचा आहे असे सांगतानाच बाहेरील परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल तरी माणसाने आत्मविश्वास व शांततेने त्याला सामोरे गेले पाहिजे असे मत उद्योजिका, शिक्षणतज्ज्ञ, व नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्किल ट्रेनिंगच्या अध्यक्षा डॉ. शमा हुसेन यांनी व्यक्त केले.
दरवर्षी प्रमाणे झील एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “ग्लो-टॉक्स” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे जगातील दोन खंडांमधून सहा आंतरराष्ट्रीय महिला सहभागी झाल्या होत्या. तमार लोलिषविली, संचालक, ग्लोबल पीस इन्स्टिटयूट, जॉर्जिया,तोशीको त्सुचिया,ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, जपान, डॉ शमा हुसेन, उद्योजिका व शिक्षणतज्ज्ञ, अध्यक्ष, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्किल ट्रेनिंग,ओमान, डॉ गुल एर्कोल बायरम ,सहयोगी प्राध्यापक, स्कुल ऑफ टुरिझम अँड हॉटेल, सीनोप युनिव्हर्सिटी,तुर्की,रानिया लाम्पू, ग्लोबल एज्युकेटर, ग्रीक, प्रा. डॉ झलिहा सलामोग्लू, विभाग प्रमुख, निगदे ओमर हालिसदेमीर युनिव्हर्सिटी, तुर्की या प्रसिद्ध महिला विविध देशांमधून झूम व युट्युब या डिजिटल माध्यमातून सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाले. झील एज्युकेशन सोसायटी आणि जागतिक महिला दिन याबद्दलची माहिती डॉ अश्विनी सोवनी, हेड, मॅनेजमेन्ट प्रोग्रॅम यांनी सांगितली.
डॉ शमा हुसेन म्हणाल्या, खरी हुशार व्यक्ती ती नाही जी फक्त परीक्षेत ९० टक्के किंवा जास्त मार्क्स मिळवते, तर जी व्यक्ती समाजात काही बदल घडवू शकते ती खरी हुशार व्यक्ती असते. नीतिशास्त्र, मूल्ये, दृष्टीकोन इत्यादींचा शिक्षणाचा समावेश असणे महत्वाचे आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी EQ आणि IQ दोन्ही महत्वाचे आहे. त्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. बाहेरील परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल तरी माणसाने आत्मविश्वास व शांततेने त्याला सामोरे गेले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
तमार लोलिषविली, जॉर्जिया, यांनी “कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेन्ट थ्रू क्रिटिकल थिंकिंग” याविषयावर मार्गदर्शन करताना संघर्षाची कारणे व त्यावर मात कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केले. त्यामध्ये २१ व्या शतकात लागणारे कौशल्ये आणि क्रिटिकल थिंकिंग हे संघर्षावर मात करण्यासाठी कसे उपयुक्त ठरते ते सांगितले.
तोशिको त्सुचिया, जपान, यांनी एक महिला म्हणून त्यांच्या आयुष्यात औद्योगिक क्षेत्रातील वेगवेगळे अनुभव सांगितले. तसेच कम्युनिकेशनचे महत्व आणि ग्राहकांबरोबर वाटाघाटी कशा करायच्या याबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ गुल एर्कोल बायरम, टर्की, यांनी आपल्या आयुष्यात आलेले अनुभव, मिळवलेले यश, आणि एक महिला म्हणून आयुष्यात आलेल्या समस्यांना कशा पद्धतीने सामोरे गेले याबद्दल त्यांनी सांगितले. त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी कसे सक्षम बनवले याबद्दलही त्यांनी सांगितले.
रानिया लाम्पू, ग्रीक यांनी महिलांवर कोविड-19 चा परिणाम व प्रभाव याबद्दल मार्गदर्शन केले. महिलांनी या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी घेतलेले परिश्रम याबद्दल त्यांनी सांगितले. तसेच कोरोना च्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा महिलांनी सर्व क्षेत्रांमध्ये कसे यश मिळवले याबद्दल त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ झलिहा सलामोग्लू , तुर्की यांनी त्यांच्या विद्यापीठात जागतिक महिला दिन कसा साजरा केला जातो व त्याचे महत्व याबद्दल त्यांनी सांगिलते. समाजामध्ये महिलांना सर्वात जास्त महत्व आहे व महिला आई, बहीण, मुलगी, बायको इ. अशा विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडत आलेल्या आहेत असे त्यांनी सांगिलते. जगात शांतता नांदण्यासाठी महिला शक्तीचे महत्व त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मा. श्री. संभाजीराव काटकर, संस्थापक अध्यक्ष (झील एजुकेशन सोसायटी) , प्रा. जयेश काटकर( सचिव,झील एजुकेशन सोसायटी), श्री. प्रदीप खांदवे,( कार्यकारी संचालक,झील एजुकेशन सोसायटी) प्रा उद्धव शिद (डायरेक्टर ऍडमिशन अँड अकॅडेमिकस ,झील एजुकेशन सोसायटी) यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेन्द्रकुमार देवकर व भावना खोत यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ.ऋषिकेश काकांडीकर यांनी केले.