चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता : अश्विनी जगताप हाती तुतारी घेणार?

चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता : अश्विनी जगताप हाती तुतारी घेणार?
चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता : अश्विनी जगताप हाती तुतारी घेणार?

पुणे(प्रतिनिधि)–विधानसभेच्या तोंडावर राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत असून चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  विद्यमान आमदार अश्विनी जगताप या हाती तुतारी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चिंचवडचे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली, आणि या पोटनिवडणुकीत  भाजपच्या अश्विनी जगताप या आमदार झाल्या. पोट निवडणुकीच्या वेळीच लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे देखील पोट निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली, आता मात्र आगामी विधानसभेसाठी अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप हे देखील इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चिंचवड मधील लढत ही दीरविरुद्ध भावजय अशी होते की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे.

अधिक वाचा  Vinesh, you are a champion among champions! : PM Modi's emotional post

चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही- अश्विनी जगताप

दरम्यान, अश्विनी जगताप या शरद पवार गटात जातील अशा चर्चा होत असताना त्यावर अश्विनी जगताप म्हणाल्या, सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. कोणीतरी या चर्चा सुरू केल्या आणि बाकी विरोधक या चर्चांना खत-पाणी खालत आहेत. लक्ष्मण जगताप यांनी आजारी असताना, ऑक्सीजन लावून ते मतदानासाठी उपस्थित राहिले होते. त्यांनी ज्या पक्षाची निष्ठा राखली, ती निष्ठा आम्ही कोणीच मोडणार नाही, लक्ष्मण जगताप यांच्यानंतर पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, पक्षाने संधी दिली त्यामुळे मी पक्षाला सोडणार नाही, तिकिट कोणालाही मिळोत, मी पक्षाचा आदेश मानणार आहे, ते ज्याला संधी देतील त्याला माझा पाठिंबा असणार आहे.

दिर-भावजय अशी लढत चिंचवडमध्ये पहायला मिळणार?

अधिक वाचा  पर्वती विधानसभेसाठी श्रीनाथ भिमाले यांची मोर्चेबांधणी  

दरम्यान,  अश्विनी जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यासंदर्भात थेटपणे नकार दिला असला तरी ऐन निवडणुकीच्या काही दिवस आधी त्या हा निर्णय घेणार नाही याची खात्री नाहकारण एकाच घरात एकाच पक्षातून दोन उमेदवार दावा करत असतील तर हा पेच कसा सोडवायचा असा मोठा प्रश्न भाजपालाही पडला आहे.  त्यामुळेच अश्विनी जगताप त्यांच्या समर्थकांसह पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे   दिर-भावजय अशी लढत चिंचवडमध्ये पहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अश्विनी जगताप वेगळा विचार करण्याची तयारीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. पवार आणि जगताप कुटुंबाचे सलोख्याचे सबंध आहेत, भाजपपूर्वी स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते, त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर अश्विनी जगताप किंवा अगदी शंकर जगतापही पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. या चर्चांमध्ये कितपत तथ्य हे येत्या काही दिवसात कळेलच.

अधिक वाचा  साखरेचा गोडवा राजकारणात आणणे गरजेचे - उद्धव ठाकरे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love